Dairy Farm : डेअरी फार्म खोलण्यासाठी सरकार देतंय अनुदान; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Dairy farm : दुग्धव्यवसाय हा शेतकऱ्यांसाठी उत्‍पन्‍नाचा उत्‍तम स्‍त्रोत ठरत आहे. अनेक लोक नोकरी करण्यापेक्षा गावात राहून दूध व्यवसाय करण्यास प्राधान्य देत आहेत. यामध्ये तुम्ही डेअरी फार्म व्‍यवसाय करून देखील चांगले पैसे कमावू शकता. या व्‍यवसायात कमी खर्चात चांगला नफा मिळतो, यासाठी तुम्हाला फक्त दुध देणारे जनावरे लागतात, तसेच सरकार सुद्धा डेअरी उघडण्यासाठी आर्थिक मदत करत आहे.

महाराष्ट्र सरकारचे अनुदान मिळवण्यासाठी इथे क्लिक करून App डाउनलोड करा

डेअरी टाकण्यासाठी गाय आणि म्हशीच्या चांगल्या जातीची निवड करणे सर्वात महत्त्वाचे आहे, तुमच्याकडे सर्व चांगल्या जातीच्या जनावरांची माहिती आधीपासूनच असली पाहिजे, याशिवाय जनावरे ठेवण्यासाठी जागा निवडावी. दुग्धव्यवसायाची विशेष बाब म्हणजे शेतकरी शेण आणि दूध विकून महिन्याला लाखो रुपये कमावत आहेत, याशिवाय याच्या शेणाचा वापर सेंद्रिय खते बनवण्यासाठीही केला जातो, या दुधापासून अनेक प्रकारची उत्पादनेही बनवली जातात. त्यामुळे हा व्यवसाय फायद्याचा ठरत आहे. (Dairy farm Project)

डेअरी फार्म खोलायचा आहे मात्र अनुदानासाठी अर्ज कोठे करायचा माहित नसेल तर तुम्ही आत्ताच प्ले स्टोअरवर जा आणि Hello Krushi हे अँप इंस्टाल करा. या अँपमध्ये तुम्ही सरकारी योजनांची माहिती मिळवू शकता. त्याचबरोबर अर्ज कसा करायचा याची देखील तुम्हाला माहिती मिळेल. त्यामुळे लगेचच प्लेस्टोअरवर जाऊन हे अँप इंस्टाल करा.

तुमच्या बजेटनुसार तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता, जर पशु मालकाला एका जनावराचे दररोज 10 लिटर दूध मिळत असेल आणि त्याच्याकडे 20 गायी आणि म्हशी असतील तर तुम्हाला 200 लिटर दूध मिळेल आणि तेच दूध तुम्ही बाजारात 50 रुपयांना विकले तर. दैनंदिन तुमच्याकडे दररोज 10,000 रुपये मिळतील तर तुम्ही एका महिन्यात 3,00,000 रुपये सहज कमवू शकता. जर तुम्ही 1,00,000 रुपये पशुसंवर्धनासाठी खर्च केले तर तुम्हाला 2,00,000 रुपये नफा होईल. त्यामुळे तुम्हाला हा व्यवसाय करणे फायद्याचे ठरेल.

ज्या शेतकऱ्यांना डेअरी फार्म खोलायचे आहे अशा शेतकऱ्यांना नाबार्ड योजनेंतर्गत 25% पर्यंत अनुदान मिळते , तर ST/SC शेतकऱ्यांना त्याच कामासाठी 33.33% पर्यंत सबसिडी दिली जाते. त्यामुळे तुम्ही डेअरी फार्म खोलून चांगला पैसे कमावू शकता.

error: Content is protected !!