Dairy Farmers : राज्यातील दूध उत्पादकांचाही दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांना आपल्या शेतमालाला योग्य भाव मिळत (Dairy Farmers) नसल्याने, ते मोठ्या विवंचनेत सापडले आहे. या पार्श्वभूमीवर नवी दिल्ली येथे देशभरातील शेतकरी हमीभाव कायदा करण्यात यावा. या मागणीसाठी केंद्र सरकारविरोधात आंदोलन करत आहे. मात्र, आता महाराष्ट्रातील दूध उत्पादक शेतकरी संघटनेने देखील नवी दिल्ली येथील या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. देशातील दुध उत्पादक शेतकऱ्यांकडून (Dairy Farmers) उत्पादित होणारे दूध हे देखील शेतमालाप्रमाणे हमीभावाच्या कक्षेत आणावे. अशी मागणी करत अखिल भारतीय किसान सहसचिव डॉ.अजित नवले यांनी दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे.

हमीभाव ‘ही’ तर सर्वांचीच इच्छा (Dairy Farmers Support Farmers Protest)

दरम्यान, नुकताच राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी संघटनांनी नवी दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत, दिल्लीला जाण्याची घोषणा केली होती. त्यात आता राज्यातील पुन्हा एका शेतकरी संघटनेने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. पंजाब आणि हरियाणातील शेतकरी जे आंदोलन करत आहे. ते शेतमालाच्या हमीभावासाठी असून, ते देशभरातल्या शेतकऱ्यासांठी फायद्याचे आहे. शेतमालाला हमीभाव मिळावा, ही तर देशरातील शेतकऱ्यांची इच्छा आहे. त्यामुळे आपण दिल्लीत होणाऱ्या आंदोलनाला जाहीरपणे पाठिंबा दर्शवत असल्याचे अखिल भारतीय किसान सहसचिव डॉ.अजित नवले यांनी म्हटले आहे.

पाच वर्षांपासून लढा सुरु

शेतमालाप्रमाणेच राज्यात दररोज लाखो लिटर दुधाचे उत्पादन होते. त्यातील जवळपास 72 टक्के दूध हे खासगी दूध संघांना विक्री केले जाते. बाकीचे दूध हे सहकारी दूध उत्पादक संघांना शेतकरी विक्री करतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांच्या दुधाला देखील योग्य दर मिळत नाही. त्यामुळे दुधाला देखील हमीभाव देण्यात यावा. या मागणीसाठी राज्यभरातील शेतकरी गेल्या पाच वर्षांपासून शेतकरी रस्त्यावर येऊन आंदोलन करत आहे. मात्र, सरकारकडून दूध उत्पादकांच्या या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे शेतमालाप्रमाणेच दुधाला देखील हमीभाव देण्यात यावा, अशी आमची मागणी असल्याचेही डॉ.अजित नवले यांनी म्हटले आहे.

डेअरी व्यवसाय घाट्याचा सौदा

दरम्यान, दुधाला हमीभावाच्या कक्षेत आणले गेले नाही तर डेअरी व्यवसाय हा शेतकऱ्यांसाठी (Dairy Farmers) नेहमीच घाट्याचा सौदा ठरत राहणार आहे. कारण सध्या हिरवा चारा, कोरडा चारा आणि पशु खाद्याच्या खर्चाची जुळवाजुळव करताना शेतकऱ्यांना नाकी दम निघत आहे. सध्याच्या घडीला खासगी व सहकारी अशा दोन्ही दूध संघांकडून दराबाबत शेतकऱ्यांची पिळवणूक सुरु आहे. त्यामुळे दुधाला हमीभाव मिळाल्यास शेतकऱ्यांची त्यातून सुटका होणार आहे. असेही त्यांनी म्हटले आहे.

error: Content is protected !!