हॅलो कृषी ऑनलाईन : मराठवाडा व विदर्भात दूध व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक गावात ‘एक सहकारी दूध संस्था’ (Dairy Farming) सुरू करण्यात येणार आहे. त्यानुसार राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना अनुदानावर दहा हजार गायी व म्हशी देण्यात येणार आहे. दोन वर्षांत मराठवाडा व विदर्भात गावपातळीवर एकाही सहकारी प्राथमिक दूध संस्थेची स्थापना झालेली नाही. हे राज्याच्या पशुपालन विभागाच्या लक्षात आल्यानंतर आता या दोन्ही प्रशासकीय विभागांचा दूध उत्पादनातील अनुशेष भरून काढण्यासाठी पशुपालन विभागाने (Dairy Farming) कंबर कसली असल्याचे सांगितले जात आहे.
मराठवाडा, विदर्भात 35 लाख लिटर उत्पादन (Dairy Farming In Maharashtra)
पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे या विदर्भ-मराठवाडा विभागांत दूध व्यवसायाला वाव आहे. पण त्याचे नियोजन नसल्याचे पशुपालन विभागाच्या लक्षात आल्यानंतर याबाबत विशेष लक्ष देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे आता पहिल्यांदाच या दोन्ही विभागांमध्ये ‘गाव तिथे सहकारी दूध संस्था’ स्थापन करण्याची जबाबदारी पशुसंवर्धन विभागावर सोपवण्यात आली आहे.
राज्याच्या दूध उत्पादनात विदर्भ व मराठवाड्यात केवळ प्रतिदिनी ३५ लाख लिटर उत्पादन होते. त्याच्या दुपटीपेक्षा अधिक दूध पश्चिम महाराष्ट्रात आहे. यासाठी राज्य सरकारने या दोन्ही विभागांवर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. राज्य सरकारने अलीकडेच दुग्धविकास विभाग (Dairy Farming) नुकताच पशुसंवर्धन विभागात विलीन करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारी दूध संघांचे अस्तित्व संपुष्टात आल्याने येथील कर्मचारी पशुसंवर्धन विभागात, तर काहींना इतर विभागात पाठवले जाणार आहे.
असे आहे राज्यातील जिल्हानिहाय दूध उत्पादन
राज्यात प्रामुख्याने अहमदनगर – २४.८९ लाख लिटर, कोल्हापूर – २०.६९ लाख लिटर, पुणे – १९.३९ लाख लिटर, सोलापूर – १५.३५ लाख लिटर, सांगली – ११.५५ लाख लिटर, नाशिक – ९.१४ लाख लिटर, सातारा – ९.०१ लाख लिटर, जळगाव – ४.९७ लाख लिटर, धाराशिव – ४.९५ लाख लिटर, बीड – ३.७० लाख लिटर, संभाजीनगर – ३.५९ लाख लिटर, लातूर – ३.१५ लाख लिटर, नांदेड – ३.०२ लाख लिटर, धुळे – २.०९ लाख लिटर, अमरावती – २.०६ लाख लिटर, बुलढाणा – १.८७ लाख लिटर, नागपूर – १.८६ लाख लिटर दूध उत्पादन (Dairy Farming) होते.
जालना – १.६७ लाख लिटर, भंडारा – १.४० लाख लिटर, परभणी- १.३५ लाख लिटर, यवतमाळ – १.३४ लाख लिटर, पालघर – १.३० लाख लिटर, ठाणे – १.२९ लाख लिटर, रायगड – १.०१ लाख लिटर, गोंदिया – १.०० लाख लिटर, हिंगोली – १.०० लाख लिटर, अकोला – ०.९८ लाख लिटर, नंदुरबार – ०.९५ लाख लिटर, वर्धा – ०.९३ लाख लिटर, चंद्रपूर – ०.७० लाख लिटर, रत्नागिरी – ०.६९ लाख लिटर, वाशिम – ०.६६ लाख लिटर, गडचिरोली – ०.४५ लाख लिटर, सिंधुदुर्ग – ०.४३ लाख लिटर, मुंबई – ०.२० लाख लिटर दूध उत्पादन (Dairy Farming) होते.