Dairy Farming : शेतकऱ्यांनो… 1962 ॲपवर नोंदणी करा, तरच सरकारी योजनांचा लाभ मिळेल!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : ‘आपले पशुधन आपली तिजोरी, कानाला बिल्ला लावून नोंद करा शासन दरबारी’ अशी हाक देत पशुसंवर्धन विभाग (Dairy Farming) पशुधनासाठी ‘बिल्ला’ सक्तीचा करताना दिसत आहे. काही महिन्यापासून पशुसंवर्धन विभागाने केंद्र सरकारच्या सूचनेनुसार एका पत्राद्वारे ‘नॅशनल डिजिटल लाइव्हस्टॉक मिशन’ अंतर्गत (एनडीएलएम)) ‘भारत पशुधन’ या संगणकीय प्रणालीचा वापर सुरु केला आहे. मात्र, आता खास पशुपालक शेतकऱ्यांसाठी 1962 हे ॲप सुरू करण्यात आले आहे. यावर नोंदणी करून पशुपालकांनी आपल्या जनावरांची माहिती अद्ययावत करण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागाकडून (Dairy Farming) करण्यात आले आहे.

काय आहेत ‘या’ ॲपचे फायदे? (Dairy Farming 1962 App For Farmers)

  • थेट लाभार्थींना लाभ (डीबीटी) : सरकारी योजनांचा लाभ थेट तुमच्या खात्यात जमा होईल.
  • खासगी क्षेत्राचा सहभाग : पशुधन व्यवसायात खासगी क्षेत्राचा सहभाग वाढेल.
  • पशु प्रजनन आणि रोग नियंत्रण : पशुधन प्रजनन आणि रोग नियंत्रण कार्यक्रम अधिक प्रभावीपणे राबवले जातील.
  • सुरक्षितता : OTP प्रणालीमुळे नोंदणी प्रक्रिया अधिक सुरक्षित आहे.
  • आपत्ती मदत : नैसर्गिक आपत्ती आणि दुष्काळात भरपाई त्वरित मिळेल.

भरपाई मिळण्यासाठी ठरणार आधारकार्ड

यासाठी शेतकऱ्यांना 1962 या ॲपमध्ये नोंदणी करून, आपल्या जनावरांना बिल्ला लावून घ्यावा लागणार आहे. तसेच त्या ठिकाणी ॲपवर तुमच्या जनावरांची माहिती (Dairy Farming) अद्ययावत ठेवावी लागणार आहे. पशुधनाला दिलेल्या बिल्ल्यांनुसार संकटात, दुष्काळात, नैसर्गिक आपत्तीमध्ये भरपाई देण्यासाठी ‘बिल्ला’ आधारकार्ड ठरणार आहे. त्यामुळे भरपाई रक्कम तातडीने संबंधित पशुधन मालकाच्या खात्यावर पडणार आहे. पशुधनमालकांनी नोंदणीसाठी पुढाकार घेतल्यास भविष्यात त्यांना कुठल्याही भरपाईसह मदतीपासून वंचित राहता येणार नाही. असेही पशुसंवर्धन विभागाने म्हटले आहे.

पायाभूत सुविधा उपलब्ध होणार

‘नॅशनल डिजिटल लाइव्हस्टॉक मिशन’ अंतर्गत देशातील जनावरांची नोंद करण्यासाठी भारत पशुधन ॲप कार्यरत आहे. या ॲपच्या माध्यमातून पशु संवर्धन विभागातील (Dairy Farming) डॉक्टर्स आपल्या कामाचा लेखाजोखा त्याचबरोबर देशातील पशुपालकांची नोंद करत आहेत. आता पशुधन मालकांना देखील ‘भारत पशुधन अॅपवर माहिती अपडेट करता येणार आहे. त्यामुळे पायाभूत सुविधा उपलब्ध करून देता येणार आहेत. असेही पशुसंवर्धन विभागाने म्हटले आहे.

error: Content is protected !!