Dairy Farming : उन्हाळ्यातील ‘हे’ 20 उपाय करतील, तुमची डेअरी उद्योगात भरभराट!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : यावर्षी राज्यातील शेतकऱ्यांना शेतीमध्ये कमी पावसाचा फटका बसला. मात्र, शेतीला जोडून केल्या जाणाऱ्या दुग्ध व्यवसायाने (Dairy Farming) शेतकऱ्यांचे कुटुंब चालवण्यासाठी मोठा आर्थिक हातभार लावला आहे. खरिपातून आणि रब्बी हंगामातून शेतकऱ्यांना फारसे उत्पन्न मिळाले नसले. तरी अनेक शेतकऱ्यांनी दूध व्यवसायातून आपल्या कुटुंबाचा गाडा ओढणे सुरु ठेवले आहे. मात्र, सध्या उन्हाळयाच्या झळा तीव्र झाल्या असून, शेतकऱ्यांना त्यातून दूध उत्पादनात घट होण्यास सामोरे जावे लागत आहे. याच पार्श्वभूमीवर आज आपण उन्हाळ्यात दुधाळ जनावरांची (Dairy Farming) काय काळजी घ्यावी, याबाबत सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

जनावरांना येतो ताणतणाव (Dairy Farming 20 Summer Solutions)

प्रामुख्याने दुधाळ जनावरांना (Dairy Farming) तीव्र उन्हामुळे ताणतणाव येतो. ज्यामुळे जनावरांच्या दूध उत्पादनात घट होते. एकीकडे उन्हाळ्यामुळे हिरव्या चाऱ्याचा तुटवडा असतो. तर सुक्या चाऱ्याच्याही किमती वाढलेल्या असतात. त्यातच उन्हाळ्यात उष्णतेमुळे पशुपालकांच्या अडचणी वाढतात. मात्र, आता पशुतज्ज्ञांकडून काही उपाय सुचवण्यात आले आहेत. ज्याद्वारे दूध उत्पादक शेतकरी दूध उत्पादनात घट होऊन, होणारे नुकसान टाळू शकतात.

उन्हाळ्यात जनावरांचा गोठा कसा असावा?

  • गोठ्यात एक गाय किंवा म्हशीसाठी 5.5 फूट रुंद आणि 10 फूट लांब जागा असावी.
  • गोठा योग्य उतारासह खडबडीत आणि ड्रेन सुविधेसह सुसज्ज असावा.
  • जनावरांच्या शेडचे छत किमान 15 फूट उंच असावे.
  • वीट किंवा गवताचे छप्पर पेंढा आणि इतर पानांनी झाकले जाऊ शकते.
  • गोठ्याचे शेड तीन बाजूंनी उघडे असावे. पूर्व-पश्चिमेला दिशेला दोन गेट असावे.
  • दिवसा शेडचा उघडा भाग बारदानाने झाकून त्यावर पाणी मारावे.
  • पश्चिमेकडील भिंतीवर जनावरांच्या चाऱ्यासाठी जागेची व्यवस्था करावी.
  • दुपारच्या वेळी जनावरांना शेडच्या आत किंवा झाडांच्या सावलीत ठेवावे.
  • शेडच्या आजूबाजूला झाडे लावावीत. जेणेकरून आतील वातावरण थंड राहते.
  • शेड थंड ठेवण्यासाठी गरजेनुसार पाण्याचे फवारे मारले जाऊ शकतात.

पाणी पाजताना घ्या ही काळजी?

  • दुधाळ जनावरांना नेहमी स्वच्छ, ताजे-थंड पाणी उपलब्ध असावे.
  • एका दुधाळ गायीला एका दिवसात कमीत कमी 75 ते 150 लिटर पाणी पाजावे.
  • स्वच्छ, ताज्या-थंड पाणी प्राण्यांच्या शरीराचे तापमान नियंत्रित करते.
  • दुधात 85 टक्के पाणी असते, त्यामुळे दुधाळ जनावरांसाठी पाण्याला खूप महत्त्व आहे.
  • पाण्याचे प्रमाण शरीराच्या इतर भागांमध्ये आवश्यक पोषक द्रव्ये पोहोचविण्यात मदत करते.
  • पाण्यामुळे जनावरांच्या शरीरातील नको असलेले आणि विषारी घटक लघवीद्वारे बाहेर काढले जातात.
  • उन्हाळ्यात जनावरांना दिवसातून दोनदा स्वच्छ पाण्याने आंघोळ घालावी.
  • जास्त दूध देणाऱ्या गाई-म्हशींसाठी शेडमध्ये पाण्याचे स्प्रिंकलर बसवता येतील.
  • शेडच्या आजूबाजूला खडकाळ भाग असेल तर छोटा तलाव बनवून तिथे म्हशी सोडता येऊ शकतात.
  • ज्यामुळे म्हशींच्या शरीरात गारवा दूध उत्पादन वाढीस मदत होते.
error: Content is protected !!