Dairy Farming : ‘हा’ एक किलो चारा, वाढवेल तुमच्या गाईचे दूध उत्पादन; पहा उगवण्याची पद्धत?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात डेअरी व्यवसाय (Dairy Farming) करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, दुष्काळी परिस्थितीमुळे यावर्षी दूध उत्पादक शेतकऱ्यांना चाऱ्याची टंचाई जाणवत आहे. अकोला व परभणी या दोन जिल्ह्याच्या जिल्ह्याधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील चारा बाहेर वाहून नेण्यास नुकतीच बंदी घातली आहे. आता तुम्हांलाही चाऱ्याची टंचाई जाणवत असेल. आणि तुमच्याकडे थोड्या फार प्रमाणात पाणी उपलब्ध असेल तर तुम्ही कमी जागेत ॲझोलाचे उत्पादन घेऊ शकतात. विशेष म्हणजे केवळ 1 किलो ॲझोला दररोज दुधाळ जनावरास (Dairy Farming) दिल्यास दूध उत्पादनात अनेक लिटरने वाढ होते. तुम्ही छोट्याश्या खड्ड्यात देखील ॲझोलाची शेती करू शकतात.

काय आहे ॲझोला? (Dairy Farming Azolla Increase Cow Milk)

ॲझोला ही एक वनस्पती असून, तिचा पाला दुधाळ जनावरांसाठी अत्यंत उपयुक्त मानला जातो. ॲझोला ही शेवाळासारखी पाण्यात वाढणारी वनस्पती आहे. तुम्ही जर दुग्ध व्यवसाय (Dairy Farming) करत असाल तर ॲझोला हे पीक तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. तुम्ही केवळ दुष्काळी परिस्थितीतच नाही तर कायमस्वरूपी या पिकाचे उत्पादन घेऊन आपल्या दूध उत्पादनात मोठी वाढ करू शकतात. दुधाळ गाय व म्हैस यांना वैरणीसोबत दररोज एक किलो इतका ॲझोलाचा पाला खायला दिल्यास, तुम्हाला गाईचे किंवा म्हशीचे दूध उत्पादन नेहमीपेक्षा काही लिटरने वाढलेले आढळून येईल.

कशी करतात ॲझोलाची शेती?

ॲझोलाचे उत्पादन घेण्यासाठी तुम्हाला एखादी प्रजाती उपलब्ध करावी लागेल. त्यानंतर 18 फूट ×3.6 फूट ×1 फूट अशा आकाराचा वाफा किंवा खड्डा तयार करावा. या वाफ्यात माती चाळून पसरून घ्यावी. त्यात आवश्यकतेनुसार 9 ते 10 किलो शेण चांगले मिसळून घ्यावे. 90 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट खत मिसळावे. त्यानंतर हा खड्डा पाण्याने संपूर्ण भरून घ्यावा. एक किलो उपलब्ध केलेला ॲझोला तुम्हाला धुवून या पाण्यावर पसरावायचा आहे. तुम्ही वाफा केल्यास शेण आणि सिंगल सुपर फॉस्फेटचे मिश्रण एका ड्रॅममध्ये तयार करून या वाफ्यावर टाकू शकतात. आणि त्यावर एक किलो उपलब्ध केलेला ॲझोला पसरवू शकतात. वाफा किंवा खड्डा तयार करताना पूर्ण बाह्य वातावरणात तयार करायचा नाहीये. तो तुम्ही पूर्णपणे कायमस्वरूपी सावली असेल. अशा ठिकाणी तयार करायचा आहे. सावलीच्या वातावरणात ॲझोलाची वाढ चांगली होते.

किती मिळते उत्पादन?

ॲझोला वाफ्यापासून तुम्हाला साधारपणे दररोज 1 किलोहुन अधिक उत्पादन मिळते. लागवडीसाठी साधारणपणे दर आठ दिवसांनी 1 ते 1.5 किलो ताजे शेण, 50 ग्रॅम खनिज मिश्रण आणि 30 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट ड्रॅममध्ये पाण्यात एकजीव करून वाफ्यावर टाकत राहावे. ज्यामुळे ॲझोलाची नियमित वाढ होण्यासाठी मदत होते. ॲझोलामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना दूध उत्पादनवाढीसाठी मोठी मदत होऊन, पशुखाद्याच्या खर्चात 15 ते 20 टक्के कपात होते. याशिवाय दुधाळ जनावरांचे (Dairy Farming) आरोग्य देखील चांगले राहते. त्यामुळे तुम्ही आपल्या दुधाळ जनावरांच्या संख्येनुसार वाफे तयार करून, ॲझोलाचे उत्पादन घेऊ शकतात.

ॲझोलाचे उत्पादन घेणे का आवश्यक आहे?

आपल्या देशात दुधाळ जनावरांना हिरवा चारा, कोरडा चारा याशिवाय धान्यांचे मिश्रण दिले जाते. मात्र, या तीनही घटकांची नेहमीच मोठी कमतरता जाणवते. अशावेळी ॲझोला हा घराच्या घरी तयार करता येणारा दुधाळ जनावरांसाठीचा पोषक आहार आहे. जो एका दुधाळ जनावरास प्रतिदिन एक किलो दिल्यास दूध उत्पादनात काही लिटरने वाढ झालेली अनुभवायला मिळते. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांनी ॲझोलाचे उत्पादन घेणे खूप गरजेचे आहे.

error: Content is protected !!