Dairy Farming : दुधाळ गाय-म्हशींसाठी संतुलित आहार; वाचा किती द्यावा दररोज चारा, खाद्य!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या शेतीला (Dairy Farming) मोठे महत्व प्राप्त झाले असून, अनेक सुशिक्षित व्यक्ती देखील सध्या शेतीकडे आकर्षिले जात आहे. तर शेतीसोबतच अनेक जण दुग्ध व्यवसाय देखील करत असतात. मात्र दुग्ध व्यवसाय करताना काही गोष्टींची काळजी घेणे खूप आवश्यक असते. याच पार्श्वभूमीवर आज आपण दुग्ध व्यवसाय करताना, आपल्या दुधाळ गाय किंवा म्हशीला दररोज किती आहार द्यावा? जेणेकरून आपली गाय किंवा म्हैस दररोज अधिक प्रमाणात दूध देईल. अर्थात तुम्हांला तुमच्या दुग्ध व्यवसायातून (Dairy Farming) आर्थिक उत्पन्न वाढण्यास मदत होईल.

आहारात धान्याचा समावेश (Dairy Farming Balanced Diet For Cow Buffalo)

शेतकऱ्यांसाठी दुग्ध व्यवसाय हा सर्वोत्तम मानला गेला आहे. मात्र, अनेकदा शेतकऱ्यांना डेअरी व्यवसाय करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. या सर्वांमध्ये अनेक शेतकरी हे गाय किंवा म्हशींना संतुलित आहार कसा द्यावा? याबाबत संभ्रमात असतात. मात्र, शेतकऱ्यांना अधिक दूध उत्पादन मिळवायचे असल्यास शेतकऱ्यांनी म्हशीला एका दिवसात 1 किलो धान्य खायला द्यावे. तर एका गाईला दिवसातून तीन किलो धान्य खायला द्यावे. गाय किंवा म्हशीच्या आहारात धान्याचे प्रमाण वाढल्यास दूध उत्पादन वाढ होण्यास मदत होते. यामध्ये तुम्ही बाजरी, तांदूळ किंवा अन्य धान्याची कणिक देऊ शकतात.

कसा बनवाल संतुलित आहार?

तुम्हीही आपल्या दुधाळ जनावरांसाठी (Dairy Farming) घरच्या घरी संतुलित आहार तयार करायचा करायचा विचार करत असाल. तर त्यासाठी तुम्हाला पुढील गोष्टींची आवश्यकता असणार आहे. यात तुम्ही मका, बार्ली, गहू, बाजरी, मोहरीची पेंड, कापूस सरकी आणि इतर आवश्यक साहित्य गरजेचे असते. 100 किलो संतुलित पशुखाद्य घरीच बनवायचे असेल तर पुढीलप्रमाणे तुम्हाला ते बनवावे लागणार आहे.

या पशुखाद्यामध्ये तुम्हाला धान्याचे प्रमाण (मका, बार्ली, गहू, बाजरी) 35 टक्के ठेवावे लागणार आहे. याशिवाय तुम्हाला ढेपेचे प्रमाण (मोहरीची ढेप, शेंगदाणा ढेप, कपाशीची सरकी ढेप, जवसाची ढेप) 32 किलोपर्यंत ठेवावे लागणार आहे. यामध्ये तुम्ही गरजेनुसार अन्य धान्य मिक्स करू शकतात. तसेच या 100 किलो मिश्रणात 35 किलो धान्याचा कोंडा (गव्हाचा कोंडा, हरभरा चूर, कडधान्य चूर, तांदळाची कणी) घालणे आवश्यक असते. यामध्ये तुम्हाला एक किलो मीठ देखील मिसळायचे आहे. इतकेच नाही तर या संतुलित आहारासोबतच गाय-म्हशींना दररोज हिरवा आणि सुका चारा योग्य त्या प्रमाणात दिला जाणे आवश्यक असते.

error: Content is protected !!