Dairy Farming : दूध उत्पादकांनो ‘या’ गवताची लागवड करा; डेअरी व्यवसायात होईल भरभराट!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्याच्या घडीला डेअरी व्यवसाय (Dairy Farming) ग्रामीण भागात शेतकऱ्यांसाठी मोठा व्यवसाय म्हणून समोर आला आहे. पशुपालन करणारे शेतकरी बहुतांशी जातिवंत दुधाळ गायी आणि म्हशी पाळण्यास प्राधान्य देतात. डेअरी व्यवसायातून शेतकऱ्यांना बऱ्यापैकी आर्थिक फायदा देखील होत आहे. मात्र, बऱ्याचदा जनावरांच्या खानपानावर विशेष लक्ष न दिल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागते. त्यामुळे डेअरी व्यवसाय सुरू करण्याआधी जनावरांची देखभाल आणि आहाराबाबत शेतकऱ्यांना अधिक माहिती असणे आवश्यक असते. त्यामुळे आता तुम्ही देखील दुग्ध उत्पादक शेतकरी असाल किंवा पशुपालन व्यवसाय (Dairy Farming) करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आज आपण बरसीम गवताबद्दल अधिक जाणून घेणार आहोत.

काय आहे बरसीम गवत? (Dairy Farming Berseem Grass)

बरसीम हे गवत शेतकरी आणि पशुपालकांसाठी (Dairy Farming) खूप महत्वाचे आहे. जनावरांच्या आहारात त्याचा समावेश केल्यास, दूध उत्पादनात वाढ होण्यास मदत होते. बरसीम गवत हे मेथीच्या भाजीप्रमाणे असलेले एक चारा पीक आहे. बरसीम नैसर्गिकरित्या उगवत नाही. परंतु जनावरांच्या चाऱ्यासाठी त्याची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. कडधान्य पीक म्हणूनही त्याची ओळख आहे. रब्बी हंगामात पाण्याची पुरेशी सोय असलेल्या भागात बरसीमची लागवड केली जाते. सुमारे दीड ते दोन महिन्यांनंतर बरसीमचे गवत कापणीला येते. हे गवत वेगाने वाढणारे गवत असून, ते 30 – 35 दिवसांच्या अंतराने पाच ते सहा वेळा कापले जाऊ शकते. विशेष म्हणजे बरसीम पेरल्याने शेताची सुपीकताही वाढते.

कसे देतात जनावरांना बरसीम गवत?

उन्हाळाच्या दिवसांमध्ये दुधाळ जनावरांची (Dairy Farming) दूध उत्पादन क्षमता कमी होते. अशा परिस्थितीत जनावरांचे दूध उत्पादन वाढविण्यासाठी पुरेसा हिरवा चारा व धान्याच्या कणेची व्यवस्था करणे आवश्यक असते. बरसीम गवत जनावरांचे दूध वाढवण्यासाठी उपयुक्त आहे. ते कापून पेंढा मिसळल्याने फायदा होतो. प्रत्येक तीन किलो पेंढ्यामध्ये दीड किलो बरसीम गवत मिसळून दुधाळ जनावरांना खायला देणे चांगले असते. पौष्टिक गुणधर्मांनी समृद्ध असण्यासोबतच ते पचायलाही सोपे असते. दुधाळ जनावरांना दररोज बरसीम खायला दिल्याने त्यांचे दूध वाढते आणि त्यांचे आरोग्यही चांगले राहते.

आर्थिक स्थिती सुधारण्यास होते मदत

जर तुमच्याकडे पाण्याची सोय असेल तर लहान जागेतही तुम्ही बरसीम गवत लागवड (Dairy Farming) करू शकतात. हे गवत वेगाने वाढण्यासोबतच जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी मदत करते. ग्रामीण भागात अनेक शेतकरी मोठ्या प्रमाणावर बरसीमची लागवड करतात. याशिवाय शहरांमध्येही राहणाऱ्या दुग्ध उत्पादकांना या गवताची विक्री केली जाते. बरसीम गवतामुळे जनावरांचे दूध उत्पादन वाढवण्याबरोबरच शेतकऱ्यांची आर्थिक स्थितीही सुधारण्यास मदत करतो.

error: Content is protected !!