Dairy Farming : थंडीमुळे दुध उत्पादनात घट झालीये; ‘अशी’ घ्या जनावरांची काळजी!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : कडाक्याची थंडी आणि त्यातच समतोल आहार न मिळाल्यास दुभत्या जनावरांच्या आरोग्यावर (Dairy Farming) मोठा परिणाम होतो. त्यामुळे डिसेंबर महिन्यात दुधाळ जनावरांची विशेष काळजी घेण्याची गरज असते. या महिन्यात दुभते जनावर गाय किंवा म्हैस आजारी राहिल्यास दूध उत्पादनात (Dairy Farming) जवळपास २० टक्क्यांनी घट होते. आर्थिकदृष्ट्या शेतकऱ्यांना हे परवडणारे नाही. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांनी या महिन्यात आपल्या दुभत्या जनावराची काळजी कशी घ्यावी याबाबत थोडक्यात जाणून घेऊया…

विशेष म्हणजे जनावरांची खरेदी-विक्री (Dairy Farming) ही डिसेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत सर्वाधिक होत असते. मात्र या काळात गाय किंवा म्हैस आजारी असेल तर त्याचा दूध उत्पादकांना मोठा फटका बसतो. त्यामुळे यासंदर्भात सरकारच्या पशुपालन विभागाकडून नियमित सल्ला जारी केला जातो. यामध्ये शेतकऱ्यांनी काही घरगुती उपाय केल्यास त्यांना या महिन्यात दूध उत्पादनात होणारी घट थांबवता येऊ शकते. तसेच आपल्या जनावराचे आरोग्यही उत्तम ठेवता येऊ शकते.

काही घरगुती उपाय (Dairy Farming During Cold Days)

  • डॉक्टरांच्या सल्ल्याने पोटातील जंतांचे औषध जनावरांना खाऊ घालावे.
  • संतुलित आहार देण्याबरोबरच खनिज मिश्रण द्यावे.
  • हिरव्या ओल्या चाऱ्यासोबत कोरडा चारा ही द्यावा.
  • कडाक्याची थंडीपासून दुभत्या जनावरांचा बचाव करण्यासाठी त्यांच्या पाठीवर आच्छादनाचा वापर करावा.
  • हा कालावधी म्हशींच्या कृत्रिम रेतनसाठी उत्तम मानला जात असल्याने या काळात म्हशींचे रेतन करावे.
  • गाय-म्हैस यांना रेतनासाठी नियमित खनिज मिश्रण द्यावे.
  • गोठ्यामध्ये स्वच्छता ठेवण्यासोबतच नियमित जंतुनाशक फवारणी करावी.
  • या काळात त्वचा रोग उद्भवत असल्याने त्यासंदर्भात डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
  • हिवाळ्यात हिरव्या चाऱ्याच्या पिकाला 15 ते 20 दिवसांनी पाणी द्यावे.

कडाक्याच्या थंडीमुळे जनावरांना लाळ्या खुरकूत रोगाची लागण होण्याची सर्वाधिक शक्यता असते. त्यामुळे संसर्गाने इतर जनावरांनाही धोका उद्भवू शकतो. त्यामुळे या काळात जनावरांचे लसीकरण आणि टॅगिंग करत प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. थंडीमुळे जनावरांना या काळात सर्वाधिक चाऱ्याची आवश्यकता असते. चारा कमी पडल्याने दूध उत्पादनात घट होते. त्यामुळे जनावरांच्या आहाराकडे लक्ष देताना गोठ्यात ऊर्जा उत्पन्न करण्यासाठी शेकोटी पेटवावी. जेणेकरून गोठ्याचे तापमान योग्य राहून जनावरांना ऊर्जा मिळेल. (मात्र असे करताना आग प्रतिबंधक उपाय लक्षात घ्यावे.)

error: Content is protected !!