Dairy Farming : गायीला केवळ कालवडच होणार; नवीन तंत्रज्ञान विकसित! वाचा…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : देशभरासह राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना (Dairy Farming) आपल्या गोठा वाढवण्याची सर्वात मोठी समस्या असते. दुग्ध व्यवसाय करताना अनेक शेतकऱ्यांना वाटते आपल्या गोठ्यात गायींची संख्या वाढावी. यासाठी गायीने कालवडींना जन्म द्यावा. मात्र, काही शेतकऱ्यांकडे सतत खोंड अर्थात नर वासरू जन्माला येते. ज्यामुळे त्यांचा दुग्ध व्यवसाय वाढण्यासाठी खीळ बसते. मात्र, नवीन तंत्रज्ञान विकसित झाले असून, कृत्रिम गर्भधारणेच्या माध्यमातून गायींपासून केवळ कालवडींना जन्म देणे शक्य होणार आहे. मध्यप्रदेश या राज्याने आपल्या शेतकऱ्यांच्या दुग्ध व्यवसायात (Dairy Farming) भरभराट आणण्यासाठी या नवीन तंत्रज्ञानाचा राज्यभर वापर करण्याचा निर्णय घेतला आहे.

काय आहे ‘हे’ तंत्रज्ञान? (Dairy Farming New Technology)

गाय व म्हैस या प्राण्यांमध्ये कृत्रिम रेतनाचे हे नवीन तंत्रज्ञान आहे. ज्यात गाय किंवा म्हैस यांचे रेतन करताना सीमेनची विरळणी करून, त्यातून मादी गाय किंवा मादी म्हैसच जन्माला यावी. यासाठी क्रोमोझोमच्या गुणसूत्रांच्या जोड्यांची क्रमवारी पशुवैद्यकीय विभागाकडून निश्चित केली जाईल. त्यानंतर त्या विशिष्ट सीमेनच्या माध्यमातून गायींचे आणि म्हशींचे रेतन केल्यानंतर, गाय केवळ कालवडीला आणि म्हैस केवळ मादी पारडूच जन्माला घालणार आहे. या तंत्रज्ञानाबाबत मध्यप्रदेश सरकारकडून शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली जात आहे. तसेच पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी घरोघरी जाऊन शेतकऱ्यांना या तंत्रज्ञानाबाबत माहिती देत आहे. याशिवाय अनेक ठिकाणी मध्यप्रदेश सरकारकडून हे तंत्रज्ञान यापूर्वी वापरण्यात देखील आले आहे.

काय आहेत ‘या’ तंत्रज्ञानाचे फायदे?

  • या तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांना आपल्या गोठ्यात गायींची आणि म्हशींची संख्या वाढवण्यास मदत होणार आहे.
  • अनेक शेतकऱ्यांकडे दुग्ध व्यवसायासाठी (Dairy Farming) भांडवल नसते. मात्र तंत्रज्ञानाच्या मदतीने आता शेतकऱ्यांना एका गायीपासून काही वर्षात अनेक गायींची उत्पत्ती करता येणे शक्य होणार आहे.
  • या तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांच्या दूध उत्पादन वाढीसह, व्यवसाय वृद्धी देखील होणार आहे.
  • ज्यामुळे भांडवलाचा अभाव असणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जाऊ गायी घेण्याची गरज पडणार नाही.

किती येणार खर्च?

शेतकऱ्यांना शेतीमध्ये कोणतेही नवीन तंत्रज्ञान आले की नेमका खर्च किती येईल? असा प्रश्न पडतो. मात्र, शेतकऱ्यांना यासाठी नेहमीप्रमाणेच रेतनासाठीचा खर्च असणार असल्याचे मध्यप्रदेश सरकारने जाहीर केले आहे. या तंत्रज्ञानाद्वारे रेतनासाठी ओपन कॅटेगरीमधील दूध उत्पादक शेतकऱ्यांना 450 रुपये तर अनुसूचित जाती व जमातीमधील दूध उत्पादक शेतकऱ्यांना 400 रुपये खर्च येणार आहे. या तंत्रज्ञानाद्वारे रेतन केल्यानंतर संबधित गायींची माहिती देखील इअर टॅगद्वारे मध्यप्रदेश सरकारकडून ठेवली जाणार आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना नंतर काही तक्रार असल्यास, त्याबाबत मदत होणार आहे.

error: Content is protected !!