Dairy Farming : दुधाळ गाय-म्हैस माती का खाते? पशुचिकित्सकांनी दिलंय ‘हे’ उत्तर; वाचा…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात दूध उत्पादक शेतकऱ्यांची (Dairy Farming) संख्या मोठी आहे. मात्र काही दूध उत्पादक शेतकरी हे आपली दुधाळ गाय किंवा म्हैस सतत माती खात असल्याच्या कारणावरून त्रस्त असतात. हा एक रोग असून, पशुतज्ज्ञाच्या माहितीनुसार त्याला पायका रोग असे म्हणतात. जो गाय किंवा म्हैस यांना फॉस्फरसच्या कमतरतेमुळे होत असतो. अशा परिस्थितीत संबंधित गाय किंवा म्हैस कागद, प्लास्टिक, माती खात असते. याच्या उपचारासाठी पशुचिकित्सकांच्या सल्ल्यानुसार गाय किंवा म्हशीला 40 ते 50 ग्रॅम खनिज मिश्रण जसे की ऍग्रीमिन, कॅल्डीमिन, मिल्कमिन, मिनरलफोर्ट, मिनिमिक्स आणि जंतनाशक औषध दररोज दिली गेली पाहिजे. याशिवाय पशुपालकांना (Dairy Farming) नेहमी पडणारे तीन प्रश्न असतात. ज्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

गायीच्या कासेतून रक्त का येते? (Dairy Farming Cow Buffalo Eating Soil)

अनेक दूध उत्पादक शेतकऱ्यांना (Dairy Farming) समस्या असते की दुधाळ जनावरांच्या कासेतून अनेकदा रक्त पडते. पशुचिकित्सकांच्या माहितीनुसार ही समस्या प्रामुख्याने जनावरांमध्ये कॅल्शियमचे प्रमाण कमी असल्यास जाणवते. अशावेळी कॅल्शियमसाठी माईफेक्स, थाई कॉल, कॅल्शियम-बोरोग्लूकोनेट ही इंजेक्शन पशुवैद्यकीय डॉक्टरकडे जाऊन संबंधित दुधाळ जनावरास देणे गरजेचे असते.

केवळ हिरवा चाराच द्यावा का?

काही दूध उत्पादक शेतकऱ्यांचा नेहमी हा प्रश्न असतो की, गाय, म्हैस या दुधाळ जनावरांना केवळ हिरवा चाराच द्यावा का? मात्र पशुचिकित्सकांच्या म्हणण्यानुसार, दुधाळच नाही तर कोणत्याही जनावरास केवळ पूर्णतः हिरवा चारा देऊ नये. हिरव्या चाऱ्यामध्ये आर्द्रता व पाण्याचे प्रमाण अधिक असल्याने जनावरास पोटफुगीमुळे (अफरा रोग) गॅसची समस्या होऊ शकते. अशाने दुधाळ जनावर चारा खाणे कमी करते. त्यामुळे भरपेट हिरवा चारा देण्यासह दररोज दुधाळ जनावरास 2 ते 4 किलो भूस किंवा अन्य कोरडा चारा देखील देणे गरजेचे असते.

काय आहे सरा आजार?

सरा हा आजार गाय, म्हैस, बैल, शेळ्या,मेंढ्या,घोडे, कुत्रा, मांजर या प्राण्यात आढळतो. हा आजार परजीवी असून, हा आजार माशी किंवा चावणाऱ्या किटकांपासून पूर्णतः पसरतो. परिणामी या आजारामुळे दूध उत्पादनात घट होऊन आर्थिक फटका बसतो. या आजाराने ग्रस्त असणारे दुधाळ जनावर सतत लघवी करते. त्याचे डोळे लाल होतात. शरीराचे तापमान वाढते. डोळ्यातून सतत पाणी वाहते. याशिवाय या आजारामुळे गाय किंवा म्हैस चारा खाणे कमी करते. ज्यामुळे अशा दुधाळ जनावराला अशक्तपणा येतो. अशा वेळी दूध उत्पादनात घट दिसून आल्यास, बेरेनिल, ट्राइक्वीन आणि एंट्रीसाइड-प्रोसाल्ट ही औषधे पशुचिकित्सकांच्या सल्ल्याने द्यावीत.

error: Content is protected !!