Dairy Farming : ‘हे’ उपाय करा, उन्हाळ्यात गाय-म्हशीचे दूध उत्पादन घटणारच नाही!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील अनके भागांमध्ये दुपारच्या सुमारास उन्हाचा चटका वाढला (Dairy Farming) असून, उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. मात्र, उन्हाळयाच्या दिवसांमध्ये दुधाळ जनावरांच्या दुधामध्ये मोठी घट होऊन, शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागते. उन्हाळयात प्रामुख्याने दुधाळ जनावरांच्या दूध उत्पादनात १० टक्क्यांहून अधिकची घसरण दिसून येते. आपल्या दुभत्या जनावरांची योग्य ती काळजी घेतल्यास, दूध उत्पादक शेतकरी आपले होणारे आर्थिक नुकसान टाळू शकतात. याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी आपल्या दुभत्या जनावरांची (Dairy Farming) उन्हाळयात कशी काळजी घ्यावी? याबाबत थोडक्यात जाणून घेऊया…

पचनप्रक्रियेवर थेट परिणाम (Dairy Farming Tips For Farmers)

उन्हाळयाच्या दिवसांमध्ये माणसालाच नाही तर जनावरांना देखील उष्णतेचा अधिक त्रास होत असतो. सध्या फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून तापमान हळूहळू वाढत असून, ऐन उन्हाळयात पारा ४५ अंशांवर पोहचल्यानंतर, जनावरे देखील उष्णतेमुळे तणावात येतात. या तणावपूर्ण स्थितीमुळे जनावरांची पचनप्रक्रिया आणि दूध उत्पादन क्षमतेवर परिणाम होत असतो. याशिवाय लहान कालवडींना देखील उन्हाचा त्रास होत असल्याने, त्यांची काळजी न घेतल्यास त्यांच्या शारीरिक विकासावर, आरोग्यावर आणि भविष्यातील रोगप्रतिकार क्षमतेवर परिणाम होत असतो.

असे वाढवा उन्हाळयात दूध उत्पादन

  • दुभत्या जनावरांवर दिवसातून दोन किंवा तीन वेळा थंड पाणी फवारा.
  • शक्य असल्यास अधिक पाण्याने अंघोळ घालावी. (यामुळे दूध उत्पादनात वाढ होण्यास मोठी मदत होते)
  • जनावरांचा गोठा हा स्वच्छ आणि हवेशीर असावा. तसेच उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये गोठ्यामध्ये पाणी फवारावे. जेणेकरून गारवा निर्माण होईल.
  • बाजूने मोकळे असलेल्या शेडच्या छतावर गवताचा थर टाकावा. किंवा चाऱ्याच्या पेंढ्या टाकाव्यात. जेणेकरून पत्रे तापून दुधाळ जनावरांना उन्हाच्या झळा लागणार नाही. तसेच गोठ्यातील तापमान नियंत्रित राहण्यासही मदत होते.
  • गोठ्याच्या पत्र्यांना वरच्या बाजूने पांढरा रंग द्यावा. पांढऱ्या रंगामुळे सूर्याची किरणे परावर्तित होण्यास मदत होते.
  • गोठ्याची उंची ही कमीत कमी दहा फूट असावी. ज्यामुळे हवा खेळती राहण्यास मदत होते.
  • गोठ्याच्या चोहोबाजूने गरम हवा आत प्रवेश करत असेल तर शक्य असल्यास बारदान लावून त्यावर नियमित पाणी शिंपावे.
  • शक्य असल्यास गोठ्यात दुपारी २ ते ३ तास पंख्याची व्यवस्था करावी.
  • दुभत्या जनावरांना पाठीवर ओले गोणपाट बांधावे.
  • दुधाळ जनावरांना दिवसातून तीन वेळा पाणी पाजावे.
error: Content is protected !!