Dairy Farming : गाई-म्हशींनाही येतो ताण; राहुरी विद्यापीठाकडून ‘पशुसल्ला अँप’ विकसित!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मानवाप्रमाणेच दुधाळ जनावरांना (Dairy Farming) देखील वातावरणातील बदलांमुळे उष्णतेचा ताण येतो. या ताणामुळे दुधाळ जनावराचे खाणे-पिणे कमी होऊन चयापचय आणि पचन क्रिया बिघडते. इतकेच नाही तर गाय किंवा म्हशींच्या प्रजननावर देखील या अति उष्णता किंवा अति थंडीचा परिणाम होतो. त्यामुळे दुधाळ जनावरांच्या आरोग्याबाबत शेतकऱ्यांना मोफत सल्ला देण्यासाठी राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने एका अँपची निर्मिती केली आहे. या अँपचे राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते बुधवारी (ता.6) लोकार्पण करण्यात आले असून, ते शेतकऱ्यांसाठी (Dairy Farming) मोफत उपलब्ध असणार आहे. असे विद्यापीठाने म्हटले आहे.

दूध उत्पादकांसाठी अँप फायदेशीर (Dairy Farming Cows, Buffaloes Also Stressed)

“सध्या वातावरणीय बदलामुळे विशेषतः कधी पावसाने दिलेली ओढ, अतिवृष्टी, ढगफुटी, तर कधी वाढते तापमान, उष्माघात व पावसाचा अकल्पित लहरीपणा अशा गोष्टी वारंवार घडतात. ज्यामुळे दुधाळ जनावरांना (Dairy Farming) चारा व पाणी पुरविण्यावर आणि जनावरांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. विशेषतः संकरित गाई व म्हशींमध्ये दुग्ध उत्पादनावर विपरित परिणाम होतो. दुभत्या गाईचे दूध उत्पादन 5 ते 20 टक्क्यांपर्यंत घटल्याचे आढळून येते. या आव्हानांवर मात करण्यासाठी हे ॲप महत्त्वाची भूमिका बजावेल. या अँपचा राज्यातील दूध उत्पादकांना मोठा फायदा होईल.” असे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी या अँप लॉन्चिंग करतेवेळी म्हटले आहे. यावेळी कृषी विभागातील अधिकारी, विद्यापीठाचे कुलगुरू कर्नल डॉ. पी.जी. पाटील हेही उपस्थित होते.

काय आहेत ‘या’ अँपचे फायदे?

राहुरी विद्यापीठाच्या या अँपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जनावरांचा ताण कमी करण्यासाठी मदत होणार आहे. यामध्ये प्रामुख्याने गोठ्यातील तापमान घटविणे, योग्य आर्द्रता राखण्याकरिता सावलीची सोय करणे, योग्य वायु विजन राखणे, गरजेनुसार संबंधित जनावरांना पिण्याकरिता थंड पाणी उपलब्ध करून देणे, फॅन किंवा फॉगर यंत्रणा स्वयंचलित पद्धतीने सुरू करणे तसेच संतुलित आहार नियोजन इत्यादी उपाय योजना करण्यासाठी वेळोवेळी सूचना दिल्या जातील. त्यामुळे हे अँप शेतकऱ्यांना खूप फायदेशीर ठरणार असल्याचे विद्यापीठाने म्हटले आहे.

याशिवाय या अँपच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या गाईंच्या गोठ्याचे किंवा स्थळाचे लोकेशन घेऊन सल्ला देखील दिला जातो. अर्थात गोठ्याचे तापमान, आर्द्रता निर्देशांक यांच्या माहितीवरून गायींच्या ताण ओळखून शेतकऱ्यांना विद्यापीठाकडून हा सल्ला दिला जातो. विद्यापीठाच्या पुणे येथील कृषी महाविद्यालयाच्या देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राने हे अँप विकसित केले आहे.

error: Content is protected !!