Dairy Farming : ‘या’ हिरव्या चाऱ्याची लागवड करा; दूध उत्पादनात होईल भरघोस वाढ!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना (Dairy Farming) चाऱ्याची मोठी टंचाई जाणवत आहे. भर उन्हाळ्यात हिरवा चारा पाहायला मिळणे तसे दुरापास्त असते. मात्र आता काही शेतकऱ्यासांठी पाण्याची उपलब्धता असल्यास ते गिनी गवत लागवड करून, आपल्या दुधाळ जनावरांसाठी कायमस्वरूपी मोठ्या प्रमाणात हिरवा चारा उत्पादित करू शकतात. या गवताची वैशिष्ट्ये म्हणजे त्याची लागवड ही सावली असलेल्या जागेत उत्तमरित्या होऊ शकते. अर्थात प्रत्येक शेतकऱ्याकडे झाडांनी झाकोळलेला एखादा कापरा असतोच. त्या ठिकाणी या गवताचे (Dairy Farming) मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाऊ शकते.

अडीच महिन्यात येते कापणीला (Dairy Farming Fodder Management)

गिनी गवताला नेपियर गवत किंवा मग हत्ती गवतही असेही म्हणतात. जे वर्षातून अनेक वेळा कापणीला येते. त्याच्या लागवडीसाठी त्याची कांडी उसाप्रमाणे जमिनीत लावली जातात. त्यानंतर हलके पाणी दिले जाते. साधारपणे जुलै-ऑगस्ट या महिन्यात याची लागवड केली जाते. त्यानंतर 70 ते 75 दिवसांत हे गवत प्रथम कंपनीला येते. अर्थात हिवाळ्यात तुमचा हिरवा चारा कापणी सुरु होतो. त्यानंतर हे गवत अनेक वेळा घासाप्रमाणे 35 ते 40 दिवसांनी पुन्हा-पुन्हा जनावरांना खाण्यासाठी (Dairy Farming) कापणीला येते.

किती मिळते उत्पादन?

शेतकरी गिनी गवताच्या चांगल्या उत्पादनासाठी युरिया किंवा जीवामरूतची फवारणी करू शकतात. गिनी गवताची वर्षातून किमान आठ वेळा काढणी केल्यास प्रति हेक्टरी 800 ते 1000 क्विंटल उत्पादन मिळू शकते. हे गवत जमिनीपासून साधारणपणे 5 फूट उंच वाढते. कापणी करताना हे गवत अर्धा फूट वरतून कापणे गरजेचे असते. जेणेकरून दुसऱ्यांदा फुटवा होण्यास मदत होते. या गवताला 10 ते 15 दिवसांच्या अंतराने पाणी देणे आवश्यक असते.

दूध उत्पादन भरघोस वाढ

शेतकरी या गवताची लागवड ही आपल्या शेताच्या बांधावर देखील करू शकतात. लागवड करताना बियाणे पद्धत आणि उसाप्रमाणे कंद लागवड अशी दोन्ही पद्धतीने लागवड केली जाऊ शकते. मात्र, लागवडीसाठी कंद लागवड पद्धत ही उत्तम मानली जाते. ज्यामुळे उगवणीनंतर दोन झाडांना योग्य ते अंतर राहण्यास मदत होते. गिनी गवतामध्ये पोषकतत्व मोठ्या प्रमाणात असतात. यात 28-36 टक्के फायबर 6.10 टक्के प्रोटीन, 0.29 टक्के फॉस्फरस याशिवाय मॅग्नेशियम आणि कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असते. हे गवत जनावरांना पचनासाठी देखील उत्तम असते. ज्यामुळे दूध उत्पादनात वाढ होण्यास मोठी मदत होते.

error: Content is protected !!