Dairy Farming : दुधाळ जनावरांना मोकळे चरायला सोडणे योग्य की अयोग्य? वाचा..सविस्तर?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्याच्या अनेक भागांमध्ये शेतीसोबतच आता डेअरी व्यवसाय (Dairy Farming) वेगाने वाढत आहे. डेअरी व्यवसायाच्या मदतीने शेतकऱ्यांच्या कुटुंबांना मोठा आर्थिक हातभार लागत आहे. मात्र, बऱ्याचदा शेतकऱ्यांसमोर प्रश्न असतो की, दुधाळ जनावरांना नेमका गोठ्यात खुट्यावर बांधून चारा द्यावा? की मग त्यांना मोकळे चरायला सोडावे? ग्रामीण भागात अनेक शेतकरी आपल्या जनावरांना मोकळ्या माळरानावर चरायला घेऊन जातात. मात्र, आज आपण अशा पद्धतीने दुधाळ जनावरांना (Dairy Farming) मोकळे चरायला सोडल्याने शेतकऱ्यांना कसे नुकसान होते? याबाबत जाणून घेणार आहोत.

कसे होते शेतकऱ्यांचे नुकसान? (Dairy Farming In Maharashtra)

येत्या महिनाभरात पावसाळा सुरु होणार आहे. पावसाळयाच्या दिवसांमध्ये ग्रामीण भागात नदीकाठी, गावठाणात किंवा मग पडीत माळरानावर मोठ्या प्रमाणात गवत उगवलेले असते. ज्यामुळे पशुपालक (Dairy Farming) आपल्या जनावरांना मोकळे चरायला घेऊन जातात. किंवा मग पीक काढल्यानंतर अशा शेतांमध्ये गवत मागे शिल्लक राहते. ते चारण्यासाठी शेतकरी जनावरे शेतात घेऊन जातात. ज्यामुळे मोठ्या प्रमाणात चाऱ्याची बचत होते. मात्र, दुधाळ जनावरांना असे मोकळे चरायला सोडणे योग्य आहे की अयोग्य हे आपण पुढील बाबींच्या माध्यमातून समजून घेणार आहोत.

1. जिकरीची पायपीट : दुधाळ जनावरांना माळरानावर चरायला घेऊन गेल्यास, त्यांची दिवसभरात अनेक किलोमीटरची पायपीट होते. ज्यामुळे त्यांची ऊर्जा नष्ट होऊन, त्यांना थकवा जाणवतो. त्याचा थेट परिणाम हा दूध उत्पादनावर होऊन, शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता असते.

2. पशुतज्ज्ञांचे मत : पशुतज्ज्ञांच्या मते दुधाळ जनावरांना मोकळे चरायला सोडणे ही अयोग्य पद्धत आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना नकळत अनेक प्रकारे नुकसान होत असते.

3. दुधाळ जनावरांना बांधून खुट्यावर चारा दिल्याने, जनावरांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. जनावराचे आरोग्य उत्तम असेल त्याचा दूध वाढीसाठी फायदा होतो. ज्यामुळे जनावरांना मोकळे सोडण्याऐवजी बांधून चारा देणे योग्य ठरते.

4. याशिवाय पावसाळ्याच्या दिवसामध्ये दुधाळ जनावरांना मोकळे चरायला सोडल्याने ते एखादे विषारी गवत खाऊ शकतात. जे आरोग्यास हानिकारक असते. ज्यामुळे अशा जनावराच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. इतकेच नाही तर दुधाळ जनावरांना सर्वाधिक आजार हे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये होत असतात. ज्यामुळे मोकळे चरायला सोडणे जनावरांच्या जीवावर देखील बेतू शकते.

5. परिणामी, शेतकऱ्यांना खुंट्यावर जनावरांना चारा देताना मोठ्या प्रमाणात चाऱ्याची गरज भासणार आहे. अशावेळी शेतकरी हे आपल्या शेतामध्ये एका विशिष्ट क्षेत्रात चाऱ्याचे उत्पादन घेऊ शकतात. यामध्ये गिनी गवतासह, शेतकरी ज्वारी, मका यांसारख्या चारा पिकांची टप्प्याटप्प्याने गरजेनुसार पेरणी करू शकतात. याशिवाय कुट्टी करून साठवून देखील ठेऊ शकतात.

error: Content is protected !!