Dairy Farming : गाय हिटवर आलीये की नाही? सांगणार जादुई पट्टा; पुण्यातील कंपनीकडून निर्मिती!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात शेतीनंतर दुसरा सर्वात महत्वाचा व्यवसाय म्हणून डेअरी व्यवसायाची (Dairy Farming) क्रेझ आहे. डेअरी व्यवसायातील यश हे प्रामुख्याने दोन गोष्टींवर अवलंबून असते. यात पहिले म्हणजे दूध आटल्यानंतर गायीने वेळेत दुसरे वासरू देणे. अर्थात त्यासाठी शेतकऱ्यांना गाय हिटवर (माजावर) आली की नाही? यावर लक्ष ठेऊन राहावे लागते. दुसरे म्हणजे शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसाय करताना गायींचे आरोग्य सांभाळावे लागते. आतापर्यंत या दोन्ही गोष्टी इतक्या सोप्या नव्हत्या. मात्र, आता केवळ पाच हजार रुपयांच्या एका पट्ट्याच्या मदतीने शेतकऱ्यांना, गायीचे वेळेत दुसरे जोप मिळवणे शक्य होणार आहे. इतकेच नाही तर गायीच्या आजारांबाबत (Dairy Farming) देखील माहिती मिळण्यास या पट्ट्यामुळे मदत होणार आहे. चला तर मग पाहूया नेमका काय आहे हा जादुई पट्टा…

‘बंधी बेल्ट’ सांगणार माहिती (Dairy Farming Cow Heat Or Not)

पुण्यातील एक नामांकित कंपनी डेअरी व्यावसायिकांसाठी (Dairy Farming) या बेल्टची (पट्टा) निर्मिती करत आहे. कंपनीच्या विक्री विभागातील एका अधिकाऱ्याने म्हटले आहे की, आतापर्यंत दूध उत्पादक शेतकरी हे आपल्या अनुभवाच्या जोरावर, गाय हिटवर आलीये की नाही? हे समजू शकत होते. मात्र, बऱ्याचदा असे होते की गाय हिटवर येऊन जाते आणि दूध उत्पादकांचे त्याच वेळेत लक्ष नसते. अशातच वेळ निघून जातो आणि अनेक शेतकऱ्यांना भाकड स्वरूपात गाय सांभाळावी लागते.

मात्र, आता आपली कंपनी एका अशा बेल्टची निर्मिती करत आहे. ज्याला ‘बंधी बेल्ट’ असे नाव देण्यात आले आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना वेळेत गाय हिटवर आलीये की नाही? याबाबत समजू शकणार आहे. इतकेच नाही तर संबंधित गायीच्या आजारांबाबत देखील या पट्ट्याच्या मदतीने शेतकऱ्यांना माहिती मिळू शकणार आहे. शेतकरी ही माहिती मोबाईल किंवा लॅपटॉपवर देखील पाहू शकतात.

भाकडपणातील चाऱ्यावरील खर्च वाचणार

सर्वसाधारणपणे जोपर्यंत वेळेत गाय हिटवर आलीये की नाही? हे समजणार नाही तोपर्यंत गायीला आर्टिफिशन इंसेमीनेशन (एआय) किंवा थेट पद्धतीने सीमेन रोपण केले जाऊ शकत नाही. मात्र आता या बंधी बेल्टमुळे गाय हिटवर आल्यावर तात्काळ माहिती मिळू शकणार आहे. अर्थात ही माहिती मिळताच दूध उत्पादक शेतकऱ्यांना (Dairy Farming) तात्काळ गायीचे रोपण करण्यास मदत होणार आहे. त्यामुळे गायीच्या सीमेन रोपणासाठी खंड पडणार नाही. आणि गाय वेळेत गाभण राहून, दूध उत्पादनास मदत होणार आहे. अर्थात गाय खाटी किंवा भाकड राहून शेतकऱ्यांना दूध उत्पादनातील अतिरिक्त चारा खर्च कमी होण्यास मदत होणार आहे.

आरोग्यविषयक माहितीही मिळणार

कंपनीच्या विक्री विभागातील अधिकाऱ्याने म्हटले आहे की, गाय आजारी असल्यास तात्काळ लक्षण दिसणे सुरु होते. मात्र बाहेरील लक्षण आपण ओळखू शकतो. आतील लक्षणांबाबत माहिती मिळणे अवघड असते. दूध उत्पादक शेतकरी एक दोन नव्हे तर 40 ते 50 किंवा मग काही शेतकरी तर 150-200 गायींच्या माध्यमातून दुग्ध व्यवसाय (Dairy Farming) करत असतात. अशावेळी शेतकरी कोणत्या-कोणत्या गायीवर लक्ष ठेवणार? अशी परिस्थिती निर्माण होते. मात्र, आता शेतकऱ्यांना या बंदी बेल्टमुळे गायीच्या प्रत्येक हालचालींची माहिती मिळू शकणार आहे. जर गायीच्या पोटामध्ये आजारपणामुळे काही बदल होत असल्यास शेतकऱ्यांना त्याबाबत तात्काळ माहिती मिळू शकणार आहे.

error: Content is protected !!