Dairy Farming : दूध उत्पादकांची फसवणूक थांबणार; संशोधकांनी शोधलीये भन्नाट पद्धत!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : अलीकडे सोशल माध्यमांच्या मदतीने दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या (Dairy Farming) फसवणूक होण्याच्या अनेक घटना समोर येत आहे.अशातच आता एक नवीन तंत्रज्ञान समोर आले आहे. प्रामुख्याने ग्रामीण भागात सध्या गाय किंवा म्हैस खरेदी करताना, चार ते पाच दिवस त्या गायीची किंवा म्हशीची दूध देण्याची क्षमता तपासली जाते. मगच गाय खरेदी केल्याची सर्व रक्कम संबंधित मालकाला दिली जाते. ही झाली गाय/म्हैस खरेदी करण्याची पारंपारिक पद्धत. मात्र, अशातही आता काही शेतकऱ्यांची फसवणूक होत असलयाचे पाहायला मिळत आहे. यावर पंजाबच्या लुधियाना येथील पशुवैद्यकीय विद्यापीठाच्या संशोधकांनी दुधाळ गाय किंवा म्हशीचा डोप टेस्ट (Dairy Farming) करण्याचा पर्याय समोर आणला आहे.

काय आहे डोप टेस्ट तंत्रज्ञान? (Dairy Farming Dope Test For Cow Buffalo)

दुधाळ गाय किंवा म्हशींची डोप चाचणी म्हणजे काय? तर संबंधित गायीला दूध वाढीसाठी अलीकडच्या काळात कृत्रिमरीत्या इंजेक्शन किंवा काही औषधे दिली गेली आहे काय? याची चाचणी केली जाते. लुधियानाच्या पशुवैद्यकीय विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्रजित सिंग यांनी म्हटले आहे की’ अलीकडे देशात सर्रासपणे काही पशुपालक आपले दुधाळ जनावर (Dairy Farming) विक्री करताना कृत्रिम दूध वाढीची इंजेक्शन देताना आढळून येतात. या दूध वाढीच्या कृत्रिम पद्धतीला ‘बूस्टिन-लैक्टोट्रॉफिन’ असेही म्हणतात. दुधाळ जनावराची विक्री करताना हे छुप्या पद्धतीने दिले जाऊ शकते. भारतात यावर पूर्णपणे बंदी आहे. असेही त्यांनी म्हटले आहे. याच गोष्टीला आळा घालण्यासाठी विद्यापीठाने दुधाळ जनावरांना दिल्या जाणाऱ्या कृत्रिम दुधवाढीची पडताळणी केली जाते.

कशी होते शेतकऱ्यांची फसवणूक?

एखाद्या दूध उत्पादकाला आपली दुधाळ गाय विक्री करायची असेल तर अनेकदा अशा गायींचे फोटो सोशल मीडियावर टाकले जातात. अनेकदा गायीचे मालक आपली गाय 20 ते 70 लिटरपर्यंत दूध देत असलयाचे प्रलोभन दाखवतात. त्यामुळे शेतकऱ्यांना देखील आपल्याकडे अशी गाय असावी. असा मनात विचार येतो. आणि सर्वसामान्य शेतकरी गाय खरेदीसाठी तयार होतात. मात्र, गाय खरेदीनंतर गाय घरी आणण्याअगोदर संबधित मालकाने, त्या गायीला दूध वाढीचे इंजेक्शन दिलेले असेल तर शेतकऱ्यांची फसवणूक होऊ शकते.

8 ते 10 दिवस असतो प्रभाव

दूध वाढीच्या कृत्रिम इंजेक्शनच्या प्रभावापूर्वी गाय किंवा म्हैस 20 लिटर दूध देत असेल, तर बूस्टिन-लॅक्टो ट्रॉफीन हे इंजेक्शन दिल्यानंतर, दुधाचे प्रमाण 30 ते 35 लिटरपर्यंत वाढू शकते. या इंजेक्शनचा प्रभाव साधारणपणे 8 ते 10 दिवस राहू शकतो. ज्यामुळे दूध उत्पादक शेतकरी संबंधित गाय मालकाला चार ते पाच दिवसांमध्ये खात्री पटल्यानंतर लगेच रक्कम देऊ शकतो. त्यानंतर 8 किंवा 10 दिवसाने गाईचे दूध कमी होऊन शेतकरी फसला जातो. त्यामुळे विद्यापीठाने यावर संशोधन करत दुधाळ गाय किंवा म्हशींची डोप चाचणी करण्यासाठी किट तयार केले आहे. ज्यामुळे गाय खरेदी करतेवेळी ही चाचणी केल्याने शेतकऱ्यांची फसवणूक थांबणार आहे.

error: Content is protected !!