Dairy Farming : गायीला दररोज ‘इतके’ लिटर पाणी पाजा; तुमची गाय देईल 20 लिटरपर्यंत दूध!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यामध्ये शेतकरी मोठ्या संख्येने दुग्ध व्यवसाय (Dairy Farming) करत आहे. दुग्ध व्यवसाय करताना शेतकऱ्यांना उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये दूध उत्पादनात घट होणे ही सर्वात मोठी समस्या असते. विशेष म्हणजे जनावरांकडे दुर्लक्ष झाल्यास दूध उत्पादनात घट होण्यासह अनेक समस्या उद्भवतात. परिणामी, शेतकऱ्यांनी दुधाळ जनावरांची विशेष काळजी घेणे आवश्यक असते. यात प्रामुख्याने शेतकऱ्यांनी जनावरांच्या चाऱ्यासह (Dairy Farming) त्यांच्या पिण्याच्या पाण्याकडे विशेष लक्ष देणे खूप गरजेचे असते.

दररोज किती पाणी आवश्यक? (Dairy Farming Drink Water To Cow For More Milk)

दूध व्यवसाय (Dairy Farming) करताना शेतकरी प्रामुख्याने दुधाळ जनावरांच्या चाऱ्याकडे तर लक्ष देतात. मात्र, दूध उत्पादन वाढीसाठी दुधाळ गायींना चाऱ्यासोबत वेळोवेळी पाणी पाजणे देखील आवश्यक असते. गायीने अधिक दूध देण्यासाठी तिने अधिकाधिक पाणी पिणे आवश्यक असते. अर्थात एखादी गाय दररोज दोन वेळा 20 लिटर दूध येत असेल. तर अशा गायीला 24 तासांमध्ये कमीत कमी 100 लिटर पाणी दिले जाणे आवश्यक आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांनी कमीत कमी तीन वेळा दुधाळ गायीला-म्हशीला पाणवठ्यावर नेणे आवश्यक असते.

चारा/पाणी यांचे प्रमाण लक्षात घ्यावे

इतकेच नाही तर एखाद्या गायीने जर 12 किलो चारा खाल्ला असेल तर अशा गायीला तो चारा पचवण्यासाठी 50 लिटर पाण्याची आवशक्यता असते. थोडक्यात काय तर एक गाय किंवा म्हशीने दिवसभरात 100 ते 150 लिटर पाणी पिणे गरजेचे असते. जेणेकरून अशी गाय किंवा म्हैस 20 लिटर दूध देण्यास सक्षम ठरते. पाणी शेतकऱ्यांनी दुधाळ जनावरांना (Dairy Farming) चारा टाकण्याचे प्रमाण आणि त्या तुलनेत पाणी पाजण्याचे प्रमाण निरीक्षणातून लक्षात घेणे आवश्यक असते.

अधिक पाणी पिण्यासाठी करा ‘हे’ उपाय

सध्याच्या घडीला ग्रामीण भागात सहसा जनावरांसाठी सिमेंटच्या पाण्याच्या टाक्या आढळतात. दुधाळ जनावरांनी (Dairy Farming) अधिकाधिक पाणी प्यावे. यासाठी शेतकऱ्यांनी या टाक्या नेहमी स्वच्छ ठेवल्या पाहिजे. किमान पंधरा दिवसांतून एकदा संपूर्ण टाकी कोरडी करून त्याला आतून चुना लावावा. त्यामुळे त्यात शेवाळ वाढणार नाही तसेच पाणी थंड राहून त्यातून कॅल्शिअमचाही थोडा पुरवठा होईल. याशिवाय गढूळ पाणी स्वच्छ करण्यासाठी पाण्यात तुरटी फिरवणे सारखा सोपा उपाय करू शकतो. बाजारात पाणी स्वच्छ करण्यासाठी सॅनिटायझर टॅबलेट ही उपलब्ध आहेत. पाणी स्वच्छ असल्यास दुधाळ गायी/म्हशी अधिक पाणी पितात.

error: Content is protected !!