Dairy Farming : दुग्धजन्य पदार्थांच्या निर्यातवाढीची गरज; डेयरी असोसिएशनचे अध्यक्ष स्पष्टच बोलले!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील दूध उत्पादनात (Dairy Farming) मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. प्रत्येक २५ वर्षानंतर देशातील दूध उत्पादन तीन पटीने वाढत आहे. मागील काही वर्षांतील आकडेवारी याबाबत खूप काही बोलून जाते. याबाबत एक चांगली गोष्ट ही आहे की देशातंर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आज राष्ट्रीय पाहणी सर्वेक्षण संस्थेच्या अहवालानुसार, भारतीय आहारात अन्य बाबींच्या तुलनेत दुधाच्या पदार्थांवर (Dairy Farming) ग्राहकांकडून अधिक खर्च केला जातो. मात्र, असे असले तरी देशांतर्गत बाजारात मागणी कायम ठेवण्यासाठी आणि निर्यात वाढवण्यासाठी खूप प्रयत्न करण्याचे गरज आहे.

गुणवत्तापूर्ण दूध उत्पादनाची गरज (Dairy Farming Milk Rate)

इंडियन डेयरी एसोसिएशनचे अध्यक्ष आणि अमूल या दूध उत्पादक (Dairy Farming) संघाचे माजी व्यवस्थापकीय संचालक डॉ. आरएस सोढ़ी यांनी एका नामांकित वृत्तसमूहाला दिलेल्या मुलाखतीत दिलेल्या मुलाखतीत याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, देशातील दूध आणि दुग्धजन्य पदार्थ जोपर्यंत गुणवत्तापूर्ण राहणार नाही. तोपर्यंत ग्राहक आणि निर्यातदार देशांकडून त्यांना मागणी मिळणार नाही. त्यामुळे सध्याच्या घडीला देशात दुधाचे उत्पादन वाढत आहे. यासोबतच गुणवत्तापूर्ण दूध उत्पादन करण्याची गरज आहे. असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.

जातिवंत गायी/म्हशींची गरज

देशात दूध उत्पादनात वाढ होत असली तरी देशातील प्रति पशु दूध उत्पादन खूपच कमी आहे. त्यामुळे दुग्धजन्य पदार्थांच्या गुणवत्ता वाढीबरोबरच शेतकऱ्यांच्या दूध उत्पादनावरील खर्च कमी करण्याची गरज आहे. यासाठी शेतकऱ्यांना चांगली जातिवंत गायी उपलब्ध करून देण्याची गरज आहे. जातिवंत गायी किंवा म्हशी उपलब्ध झाल्यास शेतकऱ्यांना आपला गोठा वाढवण्यास देखील मदत होणार आहे. यासाठी आर्टिफिशेल इंसेमीनेशन आणि आयवीएफ तंत्रज्ञानाची मदत घेतली जाऊ शकते. असेही डॉ. आरएस सोढ़ी यांनी म्हटले आहे.

डेअरी उद्योग 15 लाख कोटींचा

सध्याच्या घडीला देशातील डेअरी उद्योग हा दुसऱ्या उद्योगांपेक्षा खूप विस्तारलेला आहे. देशात 2022-23 मध्ये 231 दशलक्ष टन दूध उत्पादन नोंदवले गेले होते. अर्थात एका वर्षातील या दुधाची किंमत जवळपास 11 लाख कोटी रुपये इतकी आहे. अर्थात आपण शेण आणि चाऱ्याची खर्च एकत्रित केला तर डेअरी उद्योग प्रामुख्याने 15 लाख कोटींची उलाढाल करतो. वर्षानुवर्ष यात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. जेव्हा देशातील बाजारात एक लाख लिटर दुधाची गरज पडते. तेव्हा देशातील डेअरी उद्योगात नवीन सहा हजार रोजगार उपलब्ध होतात. ज्यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होण्यास मदत होते. असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.

error: Content is protected !!