Dairy Farming : गायींना हिरव्या चाऱ्यासोबतच, सुखा चाराही द्या; नाहीतर होईल ‘हे’ नुकसान!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात प्रामुख्याने शेतकरी दुग्ध व्यवासाय (Dairy Farming) करण्यावर अधिक भर देत आहे. मात्र, दुग्ध व्यवसायातील बारकावे लक्षात न घेतल्यामुळे शेतकऱ्यांना दूध उत्पादनातील घटीला सामोरे जावे लागते. सध्या उन्हाळ्याचा काळ सुरु असून, काही शेतकऱ्यांकडे पाणी उपलब्ध असल्यास ते मोठ्या प्रमाणात हिरवा चारा दुधाळ गायींसाठी उत्पादित करत असतात. मात्र, दररोज दुधाळ जनावरांना नियमित केवळ हिरवा चारा द्यावा का? किंवा मग अन्य कोणत्या पद्धतीने चाऱ्याचे नियोजन (Dairy Farming) करणे गरजेचे याबाबात आज आपण जाणून घेणार आहोत.

पाण्याचे प्रमाण अधिक (Dairy Farming Fodder Management)

काही शेतकऱ्यांकडे बोअरवेलला किंवा शेततळ्याचे पाणी असल्यास त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात उन्हाळाभर हिरवा चारा (Dairy Farming) असतो. ज्यामुळे शेतकरी नेहमीच आपल्या जनावरांना हिरवा चारा टाकताना दिसून येतात. मात्र, हे पूर्णतः चूकीचे असल्याचे पशुतज्ज्ञांनी म्हटले आहे. पशुतज्ज्ञांच्या माहितीनुसार, हिरव्या चाऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचे प्रमाण आढळते. ज्यामुळे नियमित हिरवा चारा खाल्याने दुधाळ जनावरास पोटफुगी, डायरिया किंवा मग अन्य रोगांचा सामना करावा लागू शकतो.

दुधाला फॅट न मिळणे

पशुतज्ज्ञांच्या माहितीनुसार, केवळ हिरव्या चाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या दूध उत्पादनाला (Dairy Farming) देखील फटका बसू शकतो. यामध्ये प्रामुख्याने दुधाच्या गुणवत्तेमध्ये मोठी घट दिसून येते. अर्थात शेतकऱ्यांना दुधाला फॅट मिळणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना दुधाळ जनावरास एखाद्या कंपनीचे प्रमाणित खनिजे मिश्रण आणि सुखा चारा देखील नियमित दिला पाहिजे. ज्यामुळे दुधाळ जनावरांचे आरोग्य ठीक राहून, दुधाची गुणवत्ता देखील मिळते.

पोटफुगी झाल्यास करा ‘हा’ उपाय?

कधी-कधी दुधाळ जनावर हिरवा चारा टाकल्यानंतर अधाश्याप्रमाणे सर्व चारा खात राहते. मात्र, त्यामुळे दुधाळ गायीला किंवा म्हशीला पोटात जंत किंवा पोटफुगी होण्याचा धोका संभवतो. अशावेळी शेतकऱ्यांनी गायीला अर्धा किलो मोहरी तेलात 50 ग्रॅम तारपीन या वनस्पतीचे तेल पाजावे. याशिवाय काही दिवस संबंधित गायीला किंवा म्हशीला हिरवा चारा उन्हात थोडासा वाळवून खायला द्यावा. ज्यामुळे त्यातील पाण्याचे प्रमाण कमी राहून, पोटफुगी झालेल्या जनावरास आराम पडण्यास मदत होईल. असेही पशुतज्ज्ञांनी म्हटले आहे.

error: Content is protected !!