Dairy Farming : म्हशीच्या मृत्यूनंतर गाव जेवण; शेतकऱ्याची अनोखी कृतज्ञता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी जितके प्रेम आपल्या कुटुंबातील सदस्यांवर करतात. तितकेच प्रेम ते आपल्या बैल, गाय, म्हैस (Dairy Farming) या पाळीव प्राण्यांवर करत असतात. त्यांना जीवापाड जपतात. शेतकऱ्यांच्या घरात अशाच एखाद्या प्राण्याचा (Dairy Farming) मृत्यू झाला की त्यांचा विधिवत दहावा विधी आणि उत्तरकार्य करण्याच्या घटना महाराष्ट्रात अलीकडे बऱ्याच चर्चेत येत असतात. अशीच काहीशी घटना हरियाणा राज्यातील चरखी दादरी गावात समोर आली आहे. दादरी गावचे शेतकरी सुखबीर सिंह यांनी आपल्या 28 वर्ष जुन्या लाडक्या म्हशीच्या मृत्यूनंतर सर्व विधी करत, पंचपकवाणाचे गाव जेवण दिल्याचे समोर आले आहे.

हरियाणा येथील शेतकरी सुखबीर सिंह यांच्या वडिलांनी 28 वर्षांपूर्वी बाजारातून एक म्हैस खरेदी केली होती. या 28 वर्षांच्या काळात या म्हशीने तब्बल 24 वेळा पारडास जन्म दिला. या 24 पारडांपासून सिंह यांच्या घरात आर्थिक भरभराट होऊन तीन पिढ्यांना आधार मिळाला. त्यामुळे या लाडक्या म्हशीने केलेल्या उपकाराची परतफेड म्हणून सिंह यांनी तिचे निधन झाल्यानंतर तिचा दहावा, तेरावा विधी आणि सर्व उत्तरकार्य केले आहे. या कार्यक्रमास नातेवाईकांसह पंचक्रोशीतील जवळपास 400 नागरिक उपस्थित होते.

पंचपकवाणाचे जेवण (Dairy Farming In India)

इतकेच नाही तर सिंह यांनी आपल्या म्हशीचे अस्थीविसर्जन, तेरावा-सतराव्या सारख्या विधी देखील केल्या आहेत. याशिवाय या शेतकऱ्यांने आपल्या लाडक्या म्हशीच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी गाव जेवण दिले. विशेष म्हणजे या कार्यक्रमात देशी तुपासह, दुधापासून बनवलेल्या पंचपकवाणाचे जेवण ठेवण्यात आले होते. यामध्ये लाडू, जलेबी, गुलाब जामून, भात, भाजी, पुरी यांचा समावेश होता. त्यामुळे सध्या आसपासच्या गावांमध्ये या शेतकऱ्याचे आपल्या लाडक्या म्हशीवरील प्रेम हा चर्चेचा विषय ठरला आहे. 28 वर्षांपूर्वी आणलेल्या या म्हशीचे नाव सुखबीर सिंह यांनी ‘लाडली’ ठेवले होते. पुढे 24 वर्षाच्या काळात या म्हशीने तब्बल 24 वेळा पारडू दिले. त्यामुळे या म्हशीचे दूध आपल्या तीन पिढ्यांनी प्यायले. तसेच तिने दिलेल्या पिल्लांचे पालनपोषण करून आपण खूप पैसे कमावल्याचे सुखबीर सिंह सांगतात.

error: Content is protected !!