Dairy Farming : देशी व जर्सी गायींमध्ये काय फरक असतो; वाचा संपूर्ण माहिती…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रासह देशामध्ये डेअरी व्यवसाय (Dairy Farming) मोठ्या प्रमाणात विस्तारला आहे. शेतीनंतर जोडधंदा म्हणून शेतकऱ्यांनी दूध व्यवसायाला प्राधान्य दिले असून, काही शेतकरी तर पूर्ण वेळ दूध व्यवसाय करताना दिसून येतात. यात काही शेतकरी हे म्हशी तर काही शेतकरी हे गायींच्या मदतीने आपला दूध व्यवसाय करत असतात. देशी व जर्सी अशा दोन्ही गायींच्या मदतीने देशात दूध व्यवसाय केला जातो. मात्र देशी आणि जर्सी गायींमध्ये (Dairy Farming) नेमका काय फरक असतो? याबाबत आज आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत.

देशी व जर्सी गायींमधील फरक (Dairy Farming Indian And Jersey Cow)

 • भारतीय देशी गायी या बॉस इंडिकस या श्रेणीतील असतात. तर जर्सी गायी या बॉस टॉरस या श्रेणीतील असतात.
 • सध्यस्थितीमध्ये देशामध्ये एकूण 33 देशी गायींच्या प्रजाती आहेत. ज्या भारतीय हवामान, या ठिकाणची चाऱ्याची उपलब्धता आणि देशातील निसर्गानुरूप विकसित करण्यात आलेल्या आहेत.
 • याउलट जर्सी ही गाईची जात इंग्लंड या देशातील जर्सी बेटावरील आहे. या गायीच्या जातीमध्ये जगातील कोणत्याही वातावरणात जुळवून घेण्याची क्षमता आहे
 • भारतातील देशी गायींचे शिंगे ही लांब आणि मोठे असतात. तर याउलट जर्सी गायींना शिंगे नसतात.
 • उत्तर भारतातील काही देशी गाई अर्थात गीर, कांकरेज, थारपारकर या प्रजातींच्या गायींचे कान लांबलचक असतात. हे मोठे कान त्यांच्या शरीराला थंड ठेवण्याचे काम करतात. याउलट जर्सी गाय थंड वातावरणातील असल्याने तिचे कान हे देशी गायींच्या तुलनेत लहान असतात.
 • भारतीय देशी गायी आपल्या जीवनकाळात एकूण 10 ते 12 किंवा त्याहून अधिक वासरांना जन्म देऊ शकतात. त्यातुलनेत जर्सी गायी या आपल्या जीवनकाळात कमी वासरांना जन्म देत असतात.
 • देशी गायींच्या कालवडींना प्रथम गर्भधारणा होण्यासाठी साधारणपणे 30 ते 36 महिने लागतात. याउलट जर्सी जातीच्या कालवडी 18 ते 24 महिन्यातच दूध उत्पादन देण्यासाठी तयार होतात.
 • देशी गायींच्या शेणामध्ये अधिक सूक्ष्मजंतू आणि सूक्ष्म पोषक तत्वे (जवळपास 85-90 टक्के) असतात. याउलट जर्सी गायींच्या शेणामध्ये केवळ 50-60 टक्के सूक्ष्मजंतू आणि सूक्ष्म पोषक तत्वे आढळतात. त्यामुळे सेंद्रिय शेतीसाठी मोठ्या प्रमाणात देशी गायींचे पालन केले जाते.
 • दूध उत्पादनाचा विचार करता देशी गायींच्या तुलनेत जर्सी गायींपासून प्रति वेत अधिक दूध उत्पादन (Dairy Farming) मिळते. याशिवाय देशी गाईच्या तुलनेत जर्सी गायीच्या कालवडी लवकर दूध देण्यास सुरुवात करतात.
 • देशी गायीच्या पाठीवर वशिंड आणि गळ्यात पोळ असतो. याउलट जर्सी गायींच्या पाठीवर वशिंड आणि गळ्याला पोळ नसतो.
 • देशी गाय आणि जर्सी यांच्या वार्षिक दूध उत्पादन क्षमतेत फरक असतो.
 • दोन्ही गायींना दुधाचे मार्केटिंग न केलेल्या ठिकाणी स्थानिक बाजारपेठेत शक्यतो दुधाला जवळपास सारखीच किंमत मिळते.
error: Content is protected !!