Dairy Farming : ‘ही’ म्हैस देते सर्वाधिक दूध; दुग्धव्यवसायात होईल चांगली कमाई!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात दुग्धव्यवसायाला जोडधंद्याचे (Dairy Farming) स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यातच देशासह जगभरात सध्या दुधाची मोठ्या प्रमाणात मागणी वाढत आहे. त्यामुळे तुम्हीही दुग्धव्यवसायात (Dairy Farming) उतरण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण दुग्धव्यवसाय सुरु करताना पहिला प्रश्न पडतो. म्हैस घ्यावी कोणती? महाराष्ट्रातील ‘मराठवाडी म्हैस’ ही दुधासाठी सर्वात चांगली म्हैस मानली जाते.

‘मराठवाडी म्हैस’ ही म्हशीची सर्वात प्राचीन (Dairy Farming) जात असून, ही म्हैस सर्वाधिक दूध देते. या म्हशीच्या दुधामध्ये प्रोटीन, कार्बोहाइड्रेट आणि जीवनसत्वे मोठ्या प्रमाणात असतात. तसेच दूध, दही, तूप, लोणी यांसारख्या डेअरी उत्पादनांसाठी मराठवाडी म्हैस उत्तम मानली जाते. मोठ्या प्रमाणात दूध देण्याची क्षमता असल्याने दुग्धव्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांची तिला पहिली पसंती असते. त्यामुळे या म्हशींची निवड केल्यास शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो. गोठ्याचे वातावरण स्वच्छ आणि चांगले ठेवल्यास, तसेच नियमित औषधे आणि लसीकरण केल्यास ही म्हैस मोठ्या प्रमाणात दूध देते, असा डेअरी व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांचा आजपर्यंतचा अनुभव आहे.

किती दूध देते? (Dairy Farming In Maharashtra)

मराठवाडी म्हशीचे वजन साधारणपणे 300 ते 400 किलो असते. ती आपल्या वेताच्या काळात 1800 ते 2500 लीटर दूध देते. या जातीच्या म्हशी आकाराने आणि वजनाने सर्वांत मोठ्या असतात. शरीर लांब आणि शरीराची हाडे पूर्ण वाढलेली पण शरीराच्या मानाने मांसल भाग कमी असतो. शिंगे मुळात जाड आणि चपटी, मुळापासून पाठीमागे आणि खालच्या बाजूने वळलेली असतात.

ठरतीये शेतकऱ्यांचा आधारस्तंभ

नावाप्रमाणेच मराठवाडी म्हैस ही प्रामुख्याने मराठवाड्यातील बीड, परभणी, जालना, नांदेड़, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळते. या म्हशीचा रंग गडद काळा असून, ती स्थानिक वातावरणात चांगल्या प्रकारे जुळवून घेते. पौष्टिक चारा नसला तरी या जातीची म्हैस टिकाव धरू शकते. तिच्या मोठ्या आणि वळणदार शिंगांसाठी ती विशेष ओळखली जाते. मराठवाड्यातील शेतकरी आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी दुग्धव्यवसायामध्ये एक सुरक्षित आणि लाभदायी पर्याय म्हणून, या म्हशींची निवड करतात. ज्यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मोठा आधार मिळाला आहे.

error: Content is protected !!