Dairy Farming : दूध उत्पादनात वाढ करायचीये; पौष्टिक चाऱ्यासाठी वापरा ‘हे’ तंत्र!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात धान लागवडीखालील क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. अनके शेतकरी धान शेतीसोबतच दुग्ध व्यवसाय (Dairy Farming) देखील करत असतात. धान काढणीनंतर शेतकरी धानाचा शेतातील पेंढा जाळून टाकतात. मात्र धानाच्या काढणीननंतर मागे राहिलेल्या पेंढ्यांची कुट्टी करून दुधाळ जनावरांना चारा म्हणून वापरल्यास, मोठया प्रमाणात चारा तर उपलब्ध होणार आहेच. याशिवाय धानाच्या पेंढ्यातील पौष्टिक घटकांमुळे दुधाळ जनावरांच्या दूध उत्पादनात वाढ देखील केली जाऊ शकते. त्यामुळे धानाचा पेंढा हा दुधाळ जनावरांचे (Dairy Farming) दूध वाढवण्यासाठी खूप महत्तवपूर्ण मानला गेला आहे.

धानाच्या पेंढ्यातील पोषकतत्वे (Dairy Farming Milk Increase Technique)

आपल्या देशात कोरड्या चाऱ्याची नेहमीच 23.4 टक्क्यांपर्यंत तर ओल्या चाऱ्याची 11.24 टक्क्यांपर्यंत कमतरता जाणवत असते. अशा वेळी शेतकऱ्यांनी उन्हाळी दिवसांसाठी धानाची कुट्टी करून, त्यास व्यवस्थित साठवून ठेवणे खूप गरजेचे असते. धानाच्या कुट्टी अर्थात भुसामध्ये कोरड्या घटकांचे प्रमाण 90 टक्के तर 10 टक्के ओलावा असतो. याशिवाय धानाच्या भुसामध्ये 3 टक्के प्रोटीन आणि 30 टक्के फायबरचे प्रमाण असते. याशिवाय धानाच्या कुट्टीमध्ये 17 टक्के सिलिका आढळून येते. यात अर्धा टक्के कॅल्शियम, 0.1 टक्के फॉस्फरस देखील आढळून येते. तथा धानाच्या कुट्टीमध्ये पचनशक्ती 30 ते 50 टक्के इतकी असते. ज्यामुळे दूध उत्पादनात वाढ होण्यास मोठी मदत होते. दूध उत्पादक शेतकऱ्यांनी (Dairy Farming) भाताच्या पेंढ्यासोबतच दुधाळ जनावरांना अन्य चारा घालणे देखील महत्वाचे असते.

कुट्टीमध्ये मिसळा ‘या’ गोष्टी

धानाच्या कुट्टीची किंवा भुसाची पचनशक्ती वाढण्यासाठी, त्यात यूरिया (अमोनिया) मिक्स करावा. यासाठी १०० किलोग्रॅम धान कुट्टीसाठी 33 लीटर पाणी आणि 4 किलोग्रॅम यूरियाचे मिश्रण करून ते कुट्टीमध्ये मिश्रित किंवा शिंपडून मिक्स करावे. ज्यामुळे दुधाळ जनावरांच्या दूध उत्पादनात वाढ होण्यासाठी खूप मदत होते. कुट्टीवर युरियाचे मिश्रण शिंपल्यानंतर साधारणपणे २१ दिवसांपर्यंत असा चारा झाकून ठेवावा.

पौष्टिकतेत होते वाढ

२१ दिवसानंतर युरिया खत हे अमोनिया वायूमध्ये परावर्तित होऊन ते धानाच्या कुट्टीची पौष्टिकता आणखी वाढवेल. याशिवाय अशी युरिया उपचारीत कुट्टी जनावरांना पचनासाठी देखील उत्तम असते. इतकेच नाही तर युरियाच्या या शिडकाव्यामुळे धानाच्या कुट्टी किंवा भुसातील जिवाणू देखील नष्ट होऊन जातात. अर्थात यामुळे दुधाळ जनावरांना आरोग्यदायी आहार मिळून दूध उत्पादनात भरघोस वाढ होण्यास मदत होते.

error: Content is protected !!