Dairy Farming : म्हैस सांगणार, ‘मी आजारी आहे, उद्या दूध कमी देईल’; संशोधक बनवताय सेन्सर!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसायाला (Dairy Farming) आपला प्रमुख व्यवसाय मानून, त्यात मोठी प्रगती साधली आहे. सध्याच्या घडीच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना आपली म्हैस आजारी आहे का? किंवा मग आजारी असेल तर अचानक दूध उत्पादनात घट का झाली? हे लक्षात येत नाही. मात्र आता हरियाणा राज्यातील हिस्सार येथील केंद्रीय म्हैस संशोधन संस्थेकडून याबाबत एक सेन्सर तयार केले जात आहे. ज्यामुळे आता देशभरातील शेतकऱ्यांना या सेन्सरमुळे आपली म्हैस स्वतः सांगणार आहे की, ‘मी आजारी आहे’, ‘मी चारा कमी खातीये’ परिणामी उद्या मी कमी दूध देईल. यासह शेतकऱ्यांना आपल्या म्हशीबाबत (Dairy Farming) अन्य माहिती देखील मिळू शकणार आहे.

‘या’ गोष्टींची मिळणार माहिती (Dairy Farming Sensor Milk Monitoring System)

तुम्हाला वाचून आश्चर्य वाटले असेल, मात्र याबाबत काम संस्थेकडून लवकरच शेतकऱ्यांना सेन्सर उपलब्ध करून दिले जाणार आहे. हे सेन्सर म्हशीच्या शरीराला लावल्यास शेतकऱ्यांच्या मोबाईलवर म्हशीसंदर्भात सर्व बाबींबाबत मेसेज येईल. यामध्ये म्हैस आजारी आहे. गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याने ती कमी चारा खातीये. यासारखी अन्य माहिती देखील मिळणार आहे. देशातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या (Dairy Farming) म्हशींची दुध उत्पादन क्षमता वाढवणे, वेळेवर गर्भधारणा होण्यासाठी आणि म्हशींना आजारांपासून वाचवण्यासाठी या सेन्सरची निर्मिती केली जाणार आहे. देशात मुऱ्हा म्हशींची संख्या सर्वाधिक 42.8 टक्के इतकी आहे. ज्यामुळे पहिल्या टप्प्यात मुऱ्हा आणि नीली रावी या दोन प्रजातीच्या म्हशींसाठी हे सेन्सर बसवले जाणार असून, त्यानंतर हळूहळू देशातील सर्व म्हशींसाठी हे सेन्सर उपलब्ध करून दिले जाणार आहे. असे संस्थेने म्हटले आहे.

15 कोटींचा निधी उपलब्ध

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हरियाणातील हिस्सार येथे वाढत्या दुग्ध उत्पादनाचा अभ्यास करत, केवळ म्हशींवर अभ्यास व संशोधन करणारी केंद्रीय म्हैस संशोधन संस्था (CIRB – सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च ऑन बफेलो) १ फेब्रुवारी १९८५ या दिवशी स्थापन करण्यात आली. सीआयआरबीच्या या सेन्सरमुळे देशभरातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे सीआईआरबीकडून एप्रिल २०२४ पासून या प्रोजेक्टवर काम सुरु केले जाणार आहे. ज्यासाठी नामांकित बिल एंड मेलिंडा गेट्स फाउंडेशनकडून या प्रोजक्टसाठी 15 कोटींचा निधी संस्थेला मिळाला आहे. त्यानुसार संस्थेतील वैज्ञानिक ऑस्ट्रेलियातील ऑडलेड युनिव्हर्सिटीसोबत मिळून या संशोधन प्रकल्पावर काम करणार आहे.

error: Content is protected !!