Dairy Farming : देशातील दूध उत्पादन, जगाच्या तुलनेत 30 टक्क्यांपर्यंत वाढवणार – शाह

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाकडून (एनडीबीबी) देशातील दूध उत्पादनात (Dairy Farming) वाढ करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहे. याचाच एक भाग म्हणून वर्ष 2030 पर्यंत देशातील दूध उत्पादन हे जगाच्या तुलनेत एक तृतीयांशपर्यंत वाढवण्याचा मानस आहे. यासाठी देशातील दुधाळ जनावरांचे प्रजनन, त्यांचे संतुलित पोषण आणि त्यांच्या आरोग्यावर भर दिला जाणार आहे. असे राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाचे अध्यक्ष मीनेश शाह यांनी म्हटले आहे. दुधाळ जनावरांचे आरोग्य चांगले असेल तरच ते दीर्घ काळापर्यंत चांगले दूध उत्पादन (Dairy Farming) देऊ शकतात. असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.

जातिवंत जनावरांच्या निर्मिती आवश्यक (Dairy Farming Milk production Increase)

सध्याच्या घडीला भारताचा जगातील एकूण दूध उत्पादनातील (Dairy Farming) वाटा हा 24 टक्के इतका आहे. अर्थात सध्या भारत जगातील एकूण दूध उत्पादनापैकी एक चतुर्थांश दूध उत्पादन करतो. मात्र, आता राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाकडून वर्ष 2030 पर्यंत देशातील दूध उत्पादन, जगाच्या तुलनेत 30 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा एनडीबीबीचा विचार आहे. जे जागतिक दूध उत्पादनाच्या तुलनेत एक तृतीयांश इतके असणार आहे. भारत सध्यस्थितीत सर्वात मोठा दूध उत्पादक देश आहे. मात्र, एक तृतीयांश दूध उत्पादनाचे लक्ष्य गाठण्यासाठी जातिवंत जनावरांच्या निर्मितीसह, त्यांच्या आरोग्यावर काम करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.

वार्षिक 6 टक्क्यांनी वाढ

केंद्र सरकार आणि राष्ट्रीय दुग्धविकास मंडळ दूध उत्पादन (Dairy Farming) वाढवण्यासाठी मिशन मोडवर काम करत आहे. यामुळेच मागील पाच ते सहा वर्षांमध्ये देशातील दूध उत्पादनात प्रति वर्ष 6 टक्क्यांनी वाढ नोंदवली गेली आहे. हीच वाढ जागतिक दूध उत्पादनाच्या वाढीच्या तुलनेत 2 टक्के इतकी आहे. त्यामुळे आता आपल्याला दूध उत्पादनातील ही वाढ कायम ठेवावी लागणार आहे. यासाठी राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाकडून देशातील काही भागांमध्ये राज्य सरकारांसोबत मिळून डेअरी व्यवसायाला प्रोत्साहन देण्याचे काम केले जात आहे. याशिवाय आगामी सात वर्षांमध्ये दुधाची मागणी देखील मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. म्हणून शेतकऱ्यांसोबत सहकार चळवळीतून दूध उत्पादनाला चालना देण्याचा विचार आहे. असेही त्यांनी म्हटले आहे

error: Content is protected !!