Dairy Farming : मिल्क रिप्लेसर म्हणजे काय? कसा होतो दुग्धव्यवसायात वापर? वाचा…संपूर्ण माहिती!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : पशुपालन व्यवसायामध्ये (Dairy Farming) जनावरांची वाढ आणि मिळणारे उत्पादन हे त्यांच्या आहार व्यवस्थापनावर अवलंबून असते. जसे आपण पिकांच्या भरघोस वाढीसाठी अगदी लहानपणापासून योग्य नियोजन करतो तेव्हा पुढे चालून आपल्या हातात भरघोस उत्पादन येते. अगदी हीच बाब पशुपालनामध्ये सुद्धा लागू पडते. जर आपण लहानपणापासून वासरांच्या सुदृढ आणि निरोगी वाढीसाठी प्रयत्न केले तर त्याचे सकारात्मक परिणाम हे पुढे दूध उत्पादनात दिसून येतात. याच पार्श्वभूमीवर आज आपण वासरांच्या शारीरिक आणि भौतिक वाढीसाठी उपयुक्त असलेल्या मिल्क रिप्लेसरची (Dairy Farming) माहिती जाणून घेणार आहोत.

मिल्क रिप्लेसर म्हणजे काय? (Dairy Farming Milk Replacers)

मिल्क रिप्लेसर म्हणजे अन्नघटकांचे कोरड्या व पावडर (Dairy Farming) स्वरूपातील मिश्रण म्हणजेच मिल्क रिप्लेसर होय. मिल्क रिप्लेसर वासरांना द्यायच्या आधी ते पाण्यात मिसळले जाते व नंतर वासरांना खायला दिले जाते. लहान वासरांच्या पचनसंस्थेची भौतिक आणि शारीरिक वाढ उत्तम होण्यासाठी मिल्क रिप्लेसर खूप महत्त्वपूर्ण ठरते. मिल्क रिप्लेसर हे स्निग्ध पदार्थ विरहित दूध पावडर, वेगवेगळ्या प्रकारचे महत्त्वाचे जीवनसत्त्वे तसेच क्षारतत्व, अँटीऑक्सीडेंट आणि उच्च दर्जाच्या प्रथिने यापासून बनवलेले असते.

मिल्क रिप्लेसरचे फायदे

  • याच्या वापरामुळे लहान वासरांच्या मरतुकीचे प्रमाण कमी होते व झपाट्याने वासराची वाढ होते.
  • वासरांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते व ते आजारी पडण्याचे प्रमाण कमी होते.
  • अगदी कमीत कमी खर्चात जातिवंत वासरांपासून येणार्‍या भविष्यकाळात जास्त उत्पादन देणाऱ्या गाई किंवा म्हशी तयार होतात.
  • मिल्क रिप्लेसर वासरांना दिल्यामुळे वासरांसाठी लागणाऱ्या दुधामध्ये बचत होऊन हे वाचलेले दूध विक्रीसाठी उपलब्ध होते.
  • गाई व म्हशीच्या दुधातील घटकांचे प्रमाण हे दूध देण्याच्या काळानुसार बदलत असते परंतु मिल्क रिप्लेसर मधील जे काही पोषक तत्वे असतात त्यांचे प्रमाण एकसारखे असते. त्यामुळे उत्तम वाढीसाठी मिल्क रिप्लेसर उपयुक्त ठरते.
  • वासरांच्या आहारामध्ये मिल्क रिप्लेसरचा वापर केल्यामुळे इन्फेकशसहिनोट्राकायटीस, टीबी व इतर काही आजारांचा प्रसार टाळला जातो.
  • गाईच्या दुधातील प्रथिने 70 ते 75 टक्के,केसीन, 25 ते 30 टक्के अल्बमिनयुक्त असतात. केसीन ज्यावेळी अबोमॅझममध्ये जाते त्यावेळी चीज सारखा घट्ट थर जमा होतो. त्याचे पचन होण्यास सहा तासांपर्यंत कालावधी लागतो त्यामुळे वासरांना भूक लागत नाही.
  • परंतु याउलट मिल्क रिप्लेसर मधील प्रथिने 70 ते 75 टक्के अल्बमिन व 25 ते 30 टक्के केसीनयुक्त असतात. त्यांचे ॲबोमॅझममध्ये पचन एक ते दीड तासांमध्ये होते व वासरांना लवकर भूक लागते. व या भुक लागण्याच्या कालावधीत वासरे गवत व इतर खुराक खाऊ शकतात. त्यामुळे वासरांची जलद वजन वाढ होण्यास मदत होते.
  • वासरे लवकर खुराक खाऊ शकतात व ते पचविण्याची शक्ती देखील त्यांच्यात तयार होते.
  • मिल्क रिप्लेसरमध्ये प्रतिजैविकांचा समावेश असल्यामुळे लहान वासरांचा आतड्याची शोषण क्षमता वाढते. त्यामुळे आहारातील जास्तीत जास्त पोषणतत्वे शरीरात शोषून त्यांचा वासराच्या वाढीसाठी उपयोग होतो.
error: Content is protected !!