Dairy Farming : दुधाला दर नाही, चारा-पशुखाद्य महागले; दूध उत्पादकांची तारेवरची कसरत!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील दूध उत्पादक शेतकरी (Dairy Farming) अडचणीत सापडला आहे. यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याने, चाऱ्याचा प्रश्न बिकट झाला असून, पशुखाद्याचे दर देखील महागले आहे. तर सध्या ऐन दुष्काळात शेतकऱ्यांना गायी-म्हशींसाठी पिण्याच्या पाण्याचा देखील बिकट प्रश्न निर्माण झाला आहे. परिणामी, अनेक शेतकऱ्यांना चारा, पाणी विकत घ्यावे लागत आहे. इतके सर्व करूनही शेतकऱ्यांना दुधाला मात्र योग्य तो दर मिळत नाहीये. ज्यामुळे सध्या दूध उत्पादक शेतकरी (Dairy Farming) मोठी तारेवरची कसरत करताना दिसून येत आहे.

निर्णयात वारंवार बदल (Dairy Farming Fodder Expensive)

गेल्या वर्षीच्या जुलै महिन्यात राज्य सरकारने राज्यातील सहकारी व खासगी दूध संघ, दूध उत्पादकांना (Dairy Farming) 3.5, 8.5 गुणवत्तेच्या दुधाला किमान 34 रुपये दर निश्चित केले होते. याबाबत दुग्ध व पशुसंवर्धन मंत्रालयामार्फत 21 जुलै 2023 रोजी शासकीय जीआर देखील काढण्यात आला होता. तेव्हापासून तर आजपर्यंत अनेकदा राज्य सरकारने वारंवार निर्णय बदलत राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांची बोळवण केली.

अनुदान घोषित मात्र दरात कपात

यावर्षीच्या जानेवारी महिन्यात राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या गायीच्या दुधासाठी 5 रुपये अनुदान जाहीर तर केले. मात्र, अनेक शेतकरी अजूनही दूध अनुदान मिळाले नसल्याबाबत शेतकऱ्यांची ओरड आहे. अशातच गेल्या आठवड्यात सरकारने राज्यातील सहकारी व खासगी दूध उत्पादक संघ 25 रुपये लिटर दराने दूध खरेदी करतील. असा फतवा काढला. अर्थात शेतकऱ्यांच्या 25 रुपये विक्री झालेल्या दुधामुळे राज्यातील सरसकट शेतकऱ्यांना दूध अनुदान योजनेचा लाभ मिळेल, असा उद्देश असल्याचे सरकारने म्हटले आहे.

अस्मानीसोबत सुलतानी संकटाचा फार्स

आजही ग्रामीण भागात दूध व्यवसायाला (Dairy Farming) नगदी पैसा मिळवून देणारा व्यवसाय म्हणून पाहिले जाते. अनेक शेतकरी ताजा पैसा मिळत असल्याने, या व्यवसायाकडे रोख ठेवतात. काही शेतकरी लाखोंची गुंतवणूक करून, या व्यवसायाकडे वळतात. मात्र, आता दुष्काळामुळे चारा पाण्याचा बिकट प्रश्न निर्माण झाल्याने अस्मानी संकटासोबत, दर कपातीच्या सुलतानी संकटामुळे देखील राज्यातील दूध उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आहे. परिणामी, डेअरी व्यवसायातून शेतकरी अन्य व्यवसायाकडे वळायला वेळ लागणार नाही.

error: Content is protected !!