Dairy Farming : दूध उत्पादकांसाठी ‘वन हेल्थ मिशन’; हे कराच, नाहीतर रोगांना बळी पडाल!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारच्या पशुपालन आणि दुग्धविकास (Dairy Farming) मंत्रालयाकडून जानेवारी 2024 हा महिना ‘वन हेल्थ मिशन’ महिना म्हणून राबवला जात आहे. सरकारचे ‘वन हेल्थ मिशन’ हे केवळ जनावरांच्याच आरोग्याशी निगडित नसून, या मिशनअंतर्गत पशुपालकांच्या आरोग्याबाबतही जनजागृती केली जात आहे. झुनोसिस हे संसर्गजन्य रोग दुधाळ जनावरांसोबतच शेतकऱ्यांनाही होण्याची शक्यता असते. या रोगामुळे माणसांसोबतच दुधाळ जनावरांना देखील मोठा त्रास होतो. त्यामुळे या रोगाबाबत जनजागृती करण्याबाबत केंद्रीय पशुपालन आणि दुग्धविकास मंत्रालयाकडून (Dairy Farming) हे ‘वन हेल्थ मिशन’ राबवले जात आहे.

काय आहे झुनोसिस रोग? (Dairy Farming One Health Mission)

झुनोसिस हा संसर्गजन्य रोग आहे. जो सर्व प्राणी, दुधाळ जनावरे यांसह माणसाला देखील होऊ शकतो. सोप्या शब्दात झुनोसिस म्हणजे प्राण्यांपासून माणसाला होणारा रोग होय. झुनोटिक रोगजनक जीवाणू, विषाणू किंवा परजीवी असतात. जे थेट संपर्काद्वारे किंवा अन्न, पाणी किंवा पर्यावरणाद्वारे जनावरांसह, माणसांमध्ये देखील पसरू शकतात. मात्र या मिशनअंतर्गत पशुपालन आणि दुग्धविकास (Dairy Farming) मंत्रालयाकडून काही टिप्स जारी करण्यात आल्या आहेत. ज्यामुळे शेतकऱ्यांसह दुधाळ जनावरांनाही या गंभीर आजारापासून दूर राहण्यास मदत होणार आहे. कोविड, स्वाइन फ्लू, एशियन फ्लू, इबोला, झीका व्हायरस, एवियन इंफ्लूंजा यांसह अनेक आजार हे झुनोसिस रोगाच्या श्रेणीतील असून, ते प्राण्यांमार्फत मानवामध्ये आले आहेत.

पशुपालन विभागाने सुचवलेले उपाय

मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, झुनोसिस या जनावरांपासून माणसाला होणाऱ्या रोगाचा प्रादुर्भाव प्रामुख्याने मच्छर आणि उडत्या कीटकांमुळे होतो. त्यामुळे आपल्या घर आणि गोठ्याचे वातावरण नेहमी स्वच्छ ठेवावे. गोठ्यामध्ये काम करताना, शक्यतो डासांपासून संपूर्ण संरक्षण मिळवण्यासाठी अंगभर कपड्यांचा वापर करावा. जेणेकरून डासांद्वारे तुम्हाला या रोगापासून बचाव करण्यास मदत होईल. याशिवाय गोठ्यातून आल्यानंतर हात-पाय व्यवस्थित धुवावेत. प्राणी संशोधकांच्या मान्यतेनुसार, माणसांना 70 ते 75 टक्के रोग हे कुत्रा, शेळी, मेंढी गाय या पाळीव प्राण्यांमार्फत होत असतात.

‘हे’ उपाय देखील महत्वाचे

वन हेल्थ मिशनअंतर्गत पशुपालन आणि दुग्धविकास मंत्रालयाने आवाहन केले आहे की, झुनोसिस रोगांपासून दूर राहण्यासाठी बंदिस्त गोठा उभारा. आपल्या गोठ्यामध्ये, पाणवठ्याच्या ठिकाणी बाहेरील जनावरांना येऊ देऊ नका. आपल्या गोठ्यामध्ये नियमित औषध फवारणी करावी. कोणत्याही नवीन दुधाळ जनावराची खरेदी केल्यास, त्याला कमीत कमी 15 दिवस आपल्या अन्य जनावरांपासून दूर ठेवा. गोठ्यामध्ये शक्यतो दुधाळ जनावरे ही वेगळ्या कप्प्यात, गाभण जनावरांना वेगळा कप्पा आणि लहान वासरांना वेगळा कप्पा असे वर्गीकरण करावे. आरोग्याच्या दृष्टीने असे वर्गीकरण केल्याने फायदा होतो.

error: Content is protected !!