Dairy Farming : ‘हे’ आहेत गायींना होणारे गंभीर आजार; वाचा… त्यांची लक्षणे!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात गायीच्या माध्यमातून दुग्ध व्यवसाय (Dairy Farming) करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. अर्थात म्हशींच्या संख्येपेक्षा राज्यात गायींची संख्या देखील अधिक आहे. याशिवाय गायीला हिंदू धर्मात पवित्र स्थान असल्याने, आज प्रत्येक शेतकऱ्याच्या गोठयात एक तरी गाय आढळते. देशात गायींच्या एकूण 51 नोंदणीकृत जाती आहेत. याशिवाय अशा सुद्धा काही जाती आहेत, ज्या नोंदणीकृत नाहीत. देशातील एकूण दूध उत्पादनात गायीच्या दुधाचा वाटा 50 टक्के इतका आहे. इतकेच नाही तर देशी गायींवर संशोधन करण्यासाठी उत्तर प्रदेशातील मेरठ या ठिकाणी देशातील सर्वात मोठे कॅटल रिसर्च सेंटर (Dairy Farming) सुरु करण्यात आले आहे.

मेरठ येथे गाय संशोधन केंद्र (Dairy Farming Serious Diseases Of Cows)

गीर, राठी, नागोरी, साहिवाल, बद्री यांसारख्या देशातील देशी गायींच्या अव्वल प्रजाती आहे. महाराष्ट्र, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, राजस्थान आणि बिहार या राज्यांमध्ये देशी गायींची संख्या सर्वाधिक आहे. याशिवाय मेरठ येथील गाय संशोधन केंद्रामार्फत (Dairy Farming) देशी गायींची संख्या वाढवण्यासाठी आर्टिफिशल सीमेन टेक्नोलॉजीचा वापर केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर आज आपण दूध उत्पादकांच्या सोयीसाठी गायींना होणाऱ्या रोगांबाबत सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

१. घटसर्प/गलघोटू : या आजारामुळे गायींना श्वास घेण्यास त्रास होतो. आणि घशाला सूज येते. या आजारावर प्रतिजैविक आणि इंजेक्शन दिले जाते. तसेच पावसाळ्यापूर्वी या आजाराचे लसीकरण करून घेणे आवश्यक असते.

२. कासदाह आजार : दुधाळ गायींना या आजारामुळे कासेमध्ये समस्या उद्भवते. दुधात गुठळ्या येणे, कासेला सूज येणे ही या आजाराची लक्षणे आहेत. या आजारावर वेगवेगळी औषधे दिली जातात. या आजाराबाबत गायींचे दूध आणि कासेची वेळोवेळी तपासणी करणे आवश्यक असते.

३. फऱ्या रोग : या आजारादरम्यान गायींना 106-107 अंशापर्यंत ताप येतो. गायीच्या पायांना सूज येते. या आजारावर पावसाळ्यापूर्वी लसीकरण करून घेणे आवश्यक आहे. आजारी गायींना निरोगी जनावरांपासून दूर ठेवणे.

४. दुग्ध ज्वर : या आजारादरम्यान गायीच्या शरीराचे तापमान कमी होते, श्वास घेण्यास त्रास होतो. अशावेळी गायीच्या प्रसूतीनंतर 15 दिवस दूध काढू नये. वासराला पाजावे. या आजारादरम्यान गायीला कॅल्शियमयुक्त आहार आणि पूरक आहार द्यावा.

५. लाळ्या खुरकत रोग : गायींच्या तोंडाला आणि पायाच्या खुरांवर पुरळ येतात. हे पुरळ फुटतात आणि जखमा खोल होतात. अशावेळी तात्काळ पशुवैद्यकीय डॉक्टरांचा (Dairy Farming) सल्ला घ्यावा. याशिवाय या आजारावर पावसाळ्यापूर्वी लसीकरण करून घ्यावे. पावसाळ्यात जनावरांना उघड्यावर चरायला सोडू नये.

६. एंथ्रेक्स रोग : या आजारादरम्यान लघवी आणि शेणात रक्त येते. गायींना खूप ताप येतो. पशुवैद्यकाशी संपर्क साधून परिस्थितीनुसार उपचार करावेत. तसेच या आजारापासून बचाव करण्यासाठी लसीकरण करून घ्यावे.

७. क्षय रोग (टीबी) : या आजारादरम्यान गाय सुस्त होते. तिला कोरडा खोकला आणि नाकातून रक्तस्त्राव होतो. रोगाची लक्षणे दिसू लागताच गायीला दवाखान्यात दाखल करावे. तसेच या आजारादरम्यान गायीच्या चारा पाण्याची विशेष काळजी घ्यावी.

८. ब्रूसेलोसिस : गायीचे पोट डाव्या बाजूने फुगते. तसेच गायीच्या पोटाला डाव्या बाजूने टॅप केल्यावर ड्रम वाजवल्यासारखा आवाज येतो.

error: Content is protected !!