Dairy Farming : ‘हे’ आहेत गायींचे काही महत्वाचे रोग; वाचा… त्यावरील घरगुती उपाय!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात दूध उत्पादक शेतकऱ्यांची (Dairy Farming) संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, शेतकरी अनेकदा गायींना होणारे आजार आणि त्यांच्या आरोग्याकडे विशेषत्वाने लक्ष देत नाहीत. ज्यामुळे दुधाळ गायींना नकळत अनेक आजार जडतात. परिणामी, गायींच्या आरोग्यावर परिणाम होऊन दूध उत्पादनाला मोठा फटका बसतो. विशेष म्हणजे दररोज गायींकडे निरीक्षणातून या आजारांवर लक्ष ठेवले जाऊ शकते. तसेच काही घरगुती उपाय करून देखील दुधाळ जनावरांवर बरे केले जाऊ शकतात. याच पार्श्वभूमीवर आज आपण दुधाळ जनावरांच्या (Dairy Farming) आजारांबाबत थोडक्यात जाणून घेणार आहोत.

आर्थिक फटका बसतो (Dairy Farming Some Important Diseases)

दुग्ध व्यवसाय (Dairy Farming) करताना शेतकऱ्यांना गायींना होणाऱ्या आजारांच्या घरगुती उपायांबद्दल माहिती असेल. तर शेतकरी आपल्या गायींना निरोगी ठेवण्यात सक्षम राहू शकतात. याउलट शेतकऱ्यांना माहिती नसेल तर एखादा छोटा आजार देखील मोठे रूप धारण करू शकतो. ज्यातून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक तोटा होण्याची शक्यता आहे. ज्यामुळे पशुपालन व्यवसाय करताना पुढील आजारांबाबत माहिती असणे आवश्यक असते.

शरीराला गोचीड होणे

गाईंना त्यांच्या शरीराला गोचीड झाल्यास, कडुलिंबाची पाने गरम पाण्यात चांगली उकळून घ्यावीत. आणि ते पाणी चांगले थंड झाल्यानंतर त्याची फवारणी गायींच्या अंगावर करावी. हा उपक्रम नियमित करायचा. ज्यामुळे गायींना होणाऱ्या गोचीडची समस्या पूर्णपणे संपुष्टात येते.

निमोनिया आजार

निमोनिया हा आजार दुधाळ गायींसाठी खूप त्रासदायक असतो. पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या मते, गायी जास्त काळ पाण्यात भिजल्यास न्यूमोनिया होतो. न्यूमोनियामुळे गाईच्या शरीराचे तापमान वाढते. श्वास घेण्यास त्रास होतो आणि नाकातून पाणी वाहू लागते. ही लक्षणे गायीमध्ये दिसल्यास टर्पेन्टाइन तेल उकळत्या पाण्यात टाकावे आणि वाफ जनावराने आत घ्यावी. यासोबत मोहरीच्या तेलात कापूर मिसळून जनावरांच्या बरगड्यांची मालिश करावी. हिवाळ्यात गाईला न्यूमोनियापासून वाचवण्यासाठी तिला गरम वाफ द्यावी.

जार न पडणे

गाय व्यायल्यानंतर पुढील पाच तासांत जार पडणे आवश्यक असते. असे झाले नाही तर गाय दूधही देत ​​नाही. त्यामुळे वेळेत जार न पडल्यास ताबडतोब पशुवैद्यकीय डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. यासोबतच दुधाळ गायीचा मागील भाग गरम पाण्याने धुवावा. असे करताना कोणत्याही परिस्थितीत जाराला स्पर्श करू नये किंवा जार खेचण्याचा प्रयत्न करू नये.

शरीराला जखम झाल्यास

दुधाळ गाय किंवा म्हैस यांना दुखापत झाल्यास, त्यावर तात्काळ इलाज करणे आवश्यक असते. त्यासाठी गायीला किंवा म्हशीला जखम दिसल्यास तात्काळ गरम पाण्यात फिनाईल किंवा पोटॅश टाकून स्वच्छ करावे. त्यामुळे जखमेत किडे असल्यास, टर्पेन्टाइन तेलात भिजवून जनावराच्या त्या भागावर पट्टी बांधावी. तोंडाच्या जखमा नेहमी तुरटीच्या पाण्याने धुवाव्यात. पण त्याचवेळी जखमेशी संबंधित उपाय जाणून घेण्यासाठी डॉक्टरांशी वेळोवेळी संपर्क साधावा.

error: Content is protected !!