Dairy Farming : 40 ते 50 लिटर दूध देणाऱ्या देशातील टॉप ३ गायी; वाचा… सविस्तर माहिती!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या राज्यासह देशात दूध व्यवसाय (Dairy Farming) झपाट्याने वाढत आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून दूध दर काहीसे कमी झाले आहे. ज्यामुळे कमी दूध देणारे दुधाळ जनावर असल्यास शेतकऱ्यांची दोन्ही बाजूने कोंडी होते. दरही उतरलेले असतात आणि योग्य त्या प्रजातीच्या गायीची निवड न केल्यास उत्पन्नात आणि उत्पादनात दोन्हीकडून शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागतो. मात्र दूध दराचे शेतकऱ्यांच्या हाती नसले तरी जातिवंत गायीची निवड करून शेतकरी मोठ्या प्रमाणात नफा मिळवू शकतात. याच पार्श्वभूमीवर आज आपण देशातील सर्वाधिक दूध देणाऱ्या गायीच्या तीन प्रजातींबद्दल (Dairy Farming) जाणून घेणार आहोत.

‘या’ आहेत सर्वाधिक दूध देणाऱ्या गायी (Dairy Farming In India)

1. गीर गाय

गीर गाय ही देशातील सर्वाधिक दूध देणारी (Dairy Farming) गाय आहे. ही गाय गुजरातमधील गीर जंगलात आढळते. मात्र, सध्या देशभर या गाईचे संगोपन केले जाते. ही गाय दररोज सरासरी 12 ते 20 लिटर दूध देते. परंतु, या गायीची योग्य काळजी घेतल्यास, ही गाय दररोज 40 ते 50 लिटर दूधही देऊ शकते असे समोर आले आहे. केवळ तीन ते चार गीर गायींच्या पालनातून, चांगला नफा मिळवता येतो. याशिवाय या जातीच्या गायीच्या दुधात औषधी गुणधर्म मोठ्या प्रमाणात आढळतात. यामुळे बाजारात तिचे दूध नेहमीच चढ्यादरात विक्री होते. गाईची ही जात महाराष्ट्रात देखील मोठ्या प्रमाणात पाळली जात आहे. अनेक पशुपालक शेतकरी या जातीच्या संगोपनातून चांगली कमाई सध्याच्या घडीला करत आहेत. या गायीच्या दुधामध्ये 4.5 टक्क्यांपर्यंत फॅट आढळते.

2. लाल सिंधी गाय

लाल सिंधी गाय सिंध प्रांतात आढळते. त्याचबरोबर ही गाय थोडीशी लाल रंगाची असल्याने या गायीला लाल सिंधी गाय नाव पडले आहे. सध्या ही गाय हरियाणा, कर्नाटक, केरळ, ओडिशा आणि पंजाबमध्येही मोठ्या प्रमाणात पाळली जाते. यूपी आणि बिहारमधील काही शेतकरी या गायींच्या संगोपनाचे कामही करत आहेत. ही गाय दररोज 15 ते 20 लिटर दूध देते. मात्र, तिची योग्य काळजी घेतल्यास, ती दररोज 40 ते 50 लिटर दूध देऊ शकते. स्वातंत्र्यापूर्वी पाकिस्तानातील सिंध प्रांतातील मूळची असलेली ‘लाल सिंधी’ गाय ही आज उत्तर भारतातील दूध उत्पादकांसाठी (Dairy Farming) उत्पन्नाचे साधन बनली आहे. लाल रंगाची आणि रुंद कपाळ असलेली ही गाय एका जोपाला 1600 ते 1700 लिटर दूध देऊ शकते. योग्य काळजी घेतल्यास या गायीच्या दूध उत्पादनात मोठी वाढ होते.

3. साहिवाल गाय

उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि हरियाणामध्ये ‘साहिवाल गाय’ अधिक प्रमाणात आढळते. या राज्यांतील शेतकऱ्यांमध्ये ही गाय सर्वाधिक लोकप्रिय आहे. ही गाय दररोज सरासरी 10 ते 15 लिटर दूध देते. मात्र या गायीची योग्य काळजी घेतल्यास ती दररोज 30 ते 40 लिटर दूध देऊ शकते. या गायीची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ती कमी जागेतही ठेवता येते. तिची जास्त काळजी घेण्याची गरज नसते. परिणामी, व्यापारी आणि शेतकरी यांचा या जातीची गाय खरेदी करण्यासाठी अधिक ओढा असतो. साहिवाल गायीचा रंग लाल आणि पोत लांब असतो. लांब कपाळ आणि लहान शिंगे इतर गायींपेक्षा वेगळे करतात. सैल शरीर आणि जड वजन असलेल्या या जातीची गाय एका जोपाला 2500 ते 3000 लिटर दूध देते.

error: Content is protected !!