Dairy Farming : दुग्ध व्यवसायात एआय तंत्रज्ञानाचा वापर; उत्पन्न वाढीसाठी होणार मदत!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील सर्वच क्षेत्रामध्ये (Dairy Farming) आर्टीफिशियल इन्टेलिजन्स (एआय) तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे. सध्याच्या घडीला सर्वच क्षेत्रांमध्ये एआय तंत्रज्ञानाच्या वापराला प्रोत्साहन दिले जात आहे. शेतीमध्ये या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे मोठा बदल पाहायला मिळत आहे. कृषी क्षेत्राच्या धर्तीवर आता डेअरी अर्थात दुग्ध व्यवसायामध्ये देखील याचा वापर भविष्यात मोठ्या प्रमाणात वाढलेला पाहायला मिळणार आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने जनावरांचे आरोग्य समजू शकणार आहे. यापूर्वी जनावरांचे बाह्य आरोग्य समजले जाऊ शकत होते. मात्र, अंतर्गत रोगांबाबत तात्काळ समजू शकणार आहे. ज्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना (Dairy Farming) देखील मोठा फायदा होणार आहे.

अनेक स्टार्टअप कंपन्या कार्यरत (Dairy Farming AI Technology)

डेअरी व्यवसायामध्ये (Dairy Farming) जनावरांच्या आरोग्यासाठी ड्रोनचा वापर वाढणार आहे. याद्वारे प्राप्त झालेली आकडेवारी संगणकात पाहिली जाऊ शकते. ज्यामुळे जनावरांच्या आजाराबाबत तात्काळ समजू शकणार आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना दूध उत्पादनाच्या वाढीसाठी मदत होणार आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होणार आहे.देशात सध्याच्या घडीला अनेक नामांकित स्टार्टअप कंपन्या आहेत. ज्या शेतकऱ्यांना तांत्रिक माहिती पुरवत आहे. या स्टार्टअप्समुळे शेतकऱ्यांना शेती आणि पशुपालन व्यवसायातील चित्र बदलण्यास मदत होत आहे.

एआय तंत्रज्ञानाचा फायदे

एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पशुपालन (Dairy Farming) करताना शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. जनावरांच्या आजाराबाबत सर्व माहिती मिळू शकणार आहे. तसेच जनावरांच्या खाण्यापिण्याच्या सवयी आणि हवामानातील बदल, बदलत्या हवामानात त्यांच्या वर्तनात होणारे बदल, रोगाची लक्षणे आणि संबंधित डेटा सहज मोबाईल आणि कॉम्पुटर मिळू शकणार आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना जनावरांची देखभाल करणे सुलभ होऊ शकणार आहे. तसेच, त्यांच्या खाण्याच्या सवयींबद्दल माहिती मिळवून, त्यांना दूध उत्पादनात सुधारणा करता येणार आहे. याशिवाय दुधाळ जनावरांच्या गर्भधारणेबाबत वेळीच माहिती मिळू शकणार आहे.

एआय तंत्रज्ञानासमोरील आव्हाने

एकीकडे एआय तंत्रज्ञानाचे फायदे असले तरी दुसरीकडे आव्हाने देखील आहेत. एआय म्हणजे काय आणि ते कसे वापरले जाऊ शकते हे बहुतेक लोकांना समजत नाही. विशेषतः नॉन-टेक्निकल क्षेत्रातील लोकांना हे समजत नाही. यामुळेच कृषी क्षेत्रात त्याचा अवलंब करण्यास उशीर होत आहे. पारंपारिक शेतकरी नवीन तंत्रज्ञानापासून दूर राहिल्याने देशातील पारंपरिक शेतकऱ्यांना हे समजण्यास अडचण येत आहे. तसेच दुसरी अडचण म्हणजे एआय स्वीकारण्यासाठी गुंतवणूकीबाबत आहे. सुरुवातीच्या टप्प्यात त्याचा वापर करणे महागात पडू शकते. यासाठी अधिक भांडवल लागते.

error: Content is protected !!