Dairy Farming : गाय-म्हशीला भिजलेला चारा घालताय; होऊ शकते दुध उत्पादनात घट!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : देशात दूध व्यवसायातून (Dairy Farming) शेतकऱ्यांनी मोठी क्रांती घडवून आणली आहे. महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात शेतकरी म्हशी गायी यांच्या माध्यमातून पशुपालन व्यवसाय करतात. मात्र शेतकऱ्यांना पशुपालन व्यवसाय करताना गाय किंवा म्हशीच्या आहारावर विशेष लक्ष देण्याची गरज असते. अनेक शेतकरी हे घाईघाईमध्ये जनावरांना ओला चारा अर्थात भिजलेला किंवा पाण्याने कुजलेला टाकून देतात. मात्र, अशा भिजलेल्या चाऱ्यामुळे गायीच्या किंवा म्हशीच्या दुध उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता असते. ज्यामुळे पशुपालकांना (Dairy Farming) मोठा आर्थिक फटका सहन करावा लागू शकतो.

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अनेक भागांमध्ये शेतकरी जनावरांच्या चाऱ्याची (Dairy Farming) विशेष काळजी घेत नाही. मग असा चारा काढणीच्या वेळी शेतात भिजला असेल, आणि त्यानंतर तो शेतकऱ्यांनी उन्हाळ्यासाठी साठवून ठेवला असेल त्यावर बुरशी चढते. मग असा काही प्रमाणात कुजलेला चारा उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये वापरला जातो. मात्र हा भिजलेला चारा जनावरांना खाऊ घालणे घातक असून, त्यातून जनावरांना लेमनाईटिश हा आजार देखील जडू शकतो. यालाच टंगफुल्ली आजार असे देखील म्हटले जाते. त्यामुळे तुम्ही तुमच्या जनावराला भिजलेला चारा खाऊ घातल्यास दुधाळ जनावर चारा खाणे कमी करते. ज्यामुळे त्याचा थेट दूध निर्मितीवर परिणाम होऊन दुधात घट होते. परिणामी दूध उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसतो. याशिवाय अशा चाऱ्यामुळे जनावरांस लेमनाईटिशची लागण देखील होऊ शकते.

लेमनाईटिशबाबत जनजागृती आवश्यक (Dairy Farming In Maharashtra)

पशुचिकित्सकांच्या म्हणण्यानुसार, लेमनाईटिश आजाराने ग्रासलेल्या जनावरांना वेळीच डॉक्टरांना दाखवले नाही तर असे जनावर जखमी देखील होऊ शकते. हा आजार प्रामुख्याने भिजलेला चारा खाल्ल्याने होतो. अनेकदा उन्हाळयात चाऱ्याची कमतरता असल्याने शेतकरी जनावरांना भिजलेला चाराही टाकून देतात. ज्यामुळे जनावरांच्या आरोग्यावर परिणाम तर होतो. शिवाय दूध उत्पादनात घट देखील होते. अशा वेळी जनावर अंगावर आजार काढत असते. पशुचिकित्सकांच्या म्हणण्यानुसार, अनेक शेतकऱ्यांना या आजाराबद्दल माहिती नसते. ज्यामुळे या आजाराबाबत जनजागृती होणे आवश्यक आहे.

लेमनाईटिशपासून बचाव?

पशुचिकित्सकांच्या म्हणण्यानुसार, या आजारापासून जनावरांना बरे करण्यासाठी लसीकरण केले जाते. याशिवाय शेतकऱ्यांनी आपल्या जनावराला हा आजार होऊ नये. यासाठी तीन महिन्यातून एकदा जंतनाशक गोळ्या देणे देखील आवश्यक आहे. ज्यामुळे या आजारापासून जनावरास 90 टक्क्यांपर्यंत संरक्षण मिळते. यानंतर एखादे दुधाळ जनावर भिजलेला चारा खाल्ल्याने आजारी दिसून येत असेल तर त्याला पशुवैद्यकीय दवाखान्यात तपासून घ्यावे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांच्या आहारावर विशेष लक्ष देण्याची गरज असून, शक्य असल्यास दुधाळ जनावरास रोज 250 ग्रॅम गहू पीठ खाऊ घालावे. ज्यामुळे दूध उत्पादनात वाढ होण्यास मदत होते.

error: Content is protected !!