Dairy Project : महाराष्ट्रातील ‘या’ शहरात उभारला जाणार 500 कोटींचा दुग्धव्यवसाय प्रकल्प

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मदर डेअरीकडून लवकरच नागपूर येथे एक नवीन प्रकल्प (Dairy Project) उभारला जाणार आहे. साधारणपणे या प्रकल्पसाठी 500 कोटींची गुंतवणूक कंपनीकडून करण्यात येणार असून, पुढील काही वर्षात या प्रकल्पाचा विस्तार 700 कोटींपर्यंत करण्याचा कंपनीचा मानस आहे. असे मदर डेअरीकडून सांगण्यात आले आहे. या प्रकल्पामुळे नागपूरला मोठा फायदा होण्यास मदत होईल.

मदर डेअरी ही देशातील आघाडीची दुग्धप्रक्रिया (Dairy Project) उद्योगातील कंपनी असून, १९७४ पासून ती नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाची (NDDB) पूर्ण मालकी असलेली उपकंपनी आहे. कंपनीच्या मंडळाकडून सुमारे 700 कोटींच्या गुंतवणुकीसाठी मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे कंपनीने नागपुरात या प्रकल्पासाठी जागा खरेदी करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. पश्चिम आणि दक्षिणकडील प्रदेशात कंपनीच्या विस्तारासाठी हा प्रकल्प महत्वाची भूमिका बजावणार आहे. असे मदर डेअरीचे व्यवस्थापकीय संचालक मनीष बदलीश यांनी सांगितले आहे. दरम्यान, आगामी काळात अन्न प्रक्रिया उद्योगासाठी कंपनीकडून कर्नाटकात एक प्रकल्प उभारला जाणार असेही ते म्हणाले.

100 शहरांमध्ये विस्तार– Dairy Project

मदर डेअरीकडे दररोज ५ दशलक्ष लिटर दुधाची प्रक्रिया करण्याची क्षमता असून, तिची उत्पादने जवळपास देशभरातील १०० शहरांमध्ये उपलब्ध आहेत. कंपनी दिल्ली, मुंबई, सौराष्ट्र आणि हैदराबाद येथे दररोज ३.२ दशलक्ष लिटर दुधाची विक्री करते. त्याशिवाय कंपनी दुग्धजन्य पदार्थांच्या विस्तृत श्रेणीचे उत्पादन आणि विपणन देखील करते, मदर डेअरीचे दूधाशिवाय,आईस्क्रिम, दही, ताक, श्रीखंड अशी उत्पादने देशभरात प्रसिद्ध आहेत. याशिवाय कंपनीचा सफल हा एक ब्रँड देखील आहे. या ब्रँडमार्फत ताजी फळे आणि भाजीपाला, स्नॅक्स, कडधान्ये आणि इतर पदार्थांची विक्री केली जाते.

महसुलात 17 टक्क्यांनी वाढ

आर्थिक वर्ष 2023 मध्ये मदर डेअरीच्या महसुलात मागील वर्षीच्या तुलनेत 17 टक्क्यांनी वाढ झाली असून, तो 14 हजार 500 कोटींपर्यंत पोहचला आहे. कंपनीकडून येत्या काळात 100 नवीन प्रक्रियाकृत उत्पादने लॉन्च केली जाणार आहेत. असेही बदलीश यांनी सांगितले आहे.

error: Content is protected !!