Dairy Research : ‘या’ राज्यात रस्त्यांवर नाही फिरत गायी; झालंय महत्वाचं संशोधन!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : बाजारात गेल्यानंतर आपल्याला अनेकदा गायी (Dairy Research) रस्त्यांवर फिरताना दिसतात. मात्र आता याबाबत नव्याने संशोधन करण्यात आल्याचे समोर आले आहे. हरियाणा राज्यातील गोसेवा आयोगाचे अध्यक्ष यांनी दावा केला आहे की, हरियाणा या संपूर्ण राज्यामध्ये गायी रस्त्यावर फिरताना दिसत नाही. हरियाणा गोसेवा आयोग आणि लाला लजपत राय पशुवैद्यकीय आणि प्राणी विज्ञान विद्यापीठ (हिसार), पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभाग, हरियाणा आणि हरियाणा पशुधन विकास मंडळ यांच्या संयुक्त प्रयत्नांतुन या गायींवर महत्वाचे संशोधन (Dairy Research) करण्यात आले आहे.

काय आहे हे संशोधन? (Dairy Research For Cow Breeds)

हरियाणामध्ये दोन विशेष जातींचे प्रमाण वाढवण्यासाठी मुक्त फिरणाऱ्या गायींचा वापर करण्यात येत आहे. यासाठी एक हायटेक लॅब (Dairy Research) उभारण्यात आली आहे. ज्या ठिकाणी भ्रूण हस्तांतरण आणि इन विट्रो फर्टिलायझेशनच्या मदतीने चांगल्या जातीचे बछडे तयार केले जात आहेत. त्यालाच मानवामध्ये ज्याप्रमाणे सरोगसी माता असतात. त्याच पद्धतीने या गायींचा वापर केला जात आहे. या लॅबमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व सुविधा आहेत. प्रयोगशाळेसाठी शास्त्रज्ञांची स्वतंत्र टीम तयार करण्यात आली आहे. या संदर्भात नुकतेच हरियाणातील लुवास येथे चर्चासत्रही आयोजित करण्यात आले होते. गायींच्या भ्रूणामध्ये हे बदल करून, गायींची फिरणे थांबवण्यात आले आहे. त्यापासून जातिवंत गायींची निर्मिती केली जात आहे.

खर्च कमी करावा लागणार

गुजरातमधील राष्ट्रीय डेअरी डेव्हलपमेंटचे भ्रूण हस्तांतरण पद्धतीचे तज्ज्ञ डॉ. सिद्धार्थ यांनी याबाबत म्हटले आहे की, जर भ्रूण हस्तांतरण तंत्रज्ञानाचा (Dairy Research) अवलंब पशुपालकांच्या पातळीवर करायचा असेल, तर त्याची खर्च कमी करावा लागणार आहे. याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ, त्याबाबतची साधने सहज उपलब्ध करून द्याव्या लागणार आहेत. मात्र, या तंत्रज्ञानाबाबत काही आव्हाने आहेत. या विशेष तंत्रासाठी 15 ते 20 गायी उपलब्ध असलेल्या अशा पशुपालकांचा शोध घेणे, जेणेकरून एकावेळी अधिक भ्रूण प्रत्यारोपण करून खर्च कमी करण्यास मदत होणार आहे. असेही त्यांनी म्हटले आहे.

error: Content is protected !!