Dairy Scheme : दूध उत्पादकांसाठी बिनव्याजी कर्ज; ‘पहा’ काय आहे अर्जाची प्रक्रिया!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : तुम्हालाही पशु किसान क्रेडिट कार्ड (Dairy Scheme) मिळाले असेल किंवा मिळवायचे असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. या कार्डच्या माध्यमातून तुम्हाला दुधाळ गाय आणि म्हैस घेण्यासाठी एकत्रितपणे 1.60 लाखांपर्यंतचे कर्ज मिळू शकणार आहे. त्यामुळे आता या कार्डच्या माध्यमातून कर्ज कसे मिळवायचे? तेही शून्य टक्के व्याजदराने (Dairy Scheme) याबाबत आपण जाणून घेणार आहोत.

केंद्र सरकारने 2024 या वर्षापासून पशुपालकांसाठी किसान क्रेडिट कार्ड वाटपाची योजना (Dairy Scheme) सुरू केली आहे. पशु किसान क्रेडिट कार्ड योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पशुपालन व्यवसायासाठी शून्य टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. जेणेकरून शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती मजबूत होण्यास मदत होऊन, त्यांचे उत्पन्न दुप्पट होणार आहे.

पशु किसान क्रेडिट कार्ड योजनेची वैशिष्ट्ये (Dairy Scheme For Farmers)

  • शेतकऱ्यांना त्यांच्या बजेटनुसार कर्ज उपलब्ध होणार
  • या योजने अंतर्गत एक गाय आणि एक म्हैस यासाठी अनुक्रमे 60 हजार 783 रुपये आणि 70 हजार 249 रुपये कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे.
  • ज्यामुळे शेतकऱ्यांना डेअरी व्यवसायासाठी प्रोत्साहन मिळणार आहे.

व्याजमुक्त कर्ज

पशुपालकांना या कार्डच्या माध्यमातून गाय आणि म्हैस खरेदी करण्यासाठी दिल्या जाणाऱ्या या 1.60 लाखांच्या कर्जावर शून्य टक्के व्याज असणार आहे. अर्थात शेतकऱ्यांना फक्त मुद्दल वापस करायची आहे. शेतकऱ्यांना हे कर्ज 7 टक्के दराने उपलब्ध होत असून, यामध्ये प्रामुख्याने केंद्र सरकार 3 टक्के, राज्य सरकार 4 टक्के व्याज भरणार आहे.

योजनेसाठीच्या अटी

  • शेतकऱ्यांना हे कर्ज 5 वर्षांच्या काळात फेडायचे आहे.
  • केवळ विहित कालावधीत शेतकऱ्यांनी कर्ज फेडल्यास त्यांना व्याजामध्ये सूट असणार आहे.

कसा कराल अर्ज

  • जवळच्या बँकेत जा आणि अर्ज घ्या.
  • आवश्यक सर्व कागदपत्रे जोडून अर्जातील विचारलेली माहिती भरा.
  • बँक अधिकाऱ्यांकडे तुमचा अर्ज आवश्यक कागदपत्रांसाहित जमा करा.
  • तुमचा अर्ज पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला पशु किसान क्रेडीट कार्ड दिले जाणार आहे.

आवश्यक कागदपत्रे

  • महाराष्ट्रातील रहिवासी असणे आवश्यक.
  • पशु आरोग्य प्रमाणपत्र.
  • आपल्या पशुचे विमा प्रमाणपत्र.
  • सिव्हिल स्कोर असणे आवश्यक आहे.
  • आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड
  • मोबाइल नंबर
error: Content is protected !!