Dairy Technology : तुमच्याही गाईला ताणतणाव येतो का? लगेच समजणार… झालंय नवं संशोधन!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : माणसाप्रमाणेच जनावरांना देखील अनेक प्रकारचा ताणतणाव येतो. जनावरांमधील (Dairy Technology) उष्माघाताचा ताण हा त्यापैकीच एक असून, या उष्माघातामुळे जनावरांना उन्हाळ्यामध्ये ज्यावेळी तापमानात वाढ होते. त्यावेळी जनावरांना त्रास होऊन, जनावरांचे दूध उत्पादन व प्रजनन क्षमता कमी होते. मात्र आता जनावरांमधील तापमान, आर्द्रता निर्देशांक आधारित पशु सल्ला देणारे एक ॲप विकसित करण्यात राहुरी कृषी विद्यापीठास (Dairy Technology ) यश आले आहे.

पुण्यामध्ये राहुरी कृषी विद्यापीठातर्फे नुकत्याच एका आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेमध्ये जनावरांमधील (Dairy Technology) तापमान, आर्द्रता निर्देशांक आधारित पशु सल्ला देणारे ॲप विकसित करणाऱ्या डॉ. सोमनाथ माने व डॉ. धीरज कणखरे या पशुशास्त्रज्ञांचा सन्मान करण्यात आला. विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. प्रशांतकुमार पाटील व संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार यांच्या विशेष मार्गदर्शनातून हे ॲप तयार करण्यात आले आहे. दरम्यान, जनावरामधील तापमान, आर्द्रता निर्देशांक जास्त वाढला तर त्यानुसार गोठ्यामध्ये फॅन व फॉगिंग सिस्टीम सुद्धा स्वयंचलित होणार आहे. या ॲपच्या माध्यमातून उष्माघातामध्ये किंवा तापमान वाढीमध्ये जनावरांचे गोठ्यातील नियोजन, चारा व आहार नियोजन, खाण्याच्या वेळा, पाणी नियोजन या बाबींविषयी माहिती मिळू शकणार आहे

काय आहे ॲपची संकल्पना (Dairy Technology Cow Get Stressed)

सध्या तापमान बदलाचा फटका सर्व क्षेत्रांना बसत असून, दुग्ध व्यवसाय देखील त्यापासून वेगळा राहिलेला नाही. उष्माघाताचा दुधाळ जनावरांवर परिणाम होऊन, दूध उत्पादनांत उन्हाळयात मोठी घट होते. याच पार्श्वभूमीवर हे ॲप तयार करण्यात आले असून, या अँपमुळे गाईमध्ये होणाऱ्या उष्माघाताचा त्रासाचा परिणाम काही प्रमाणात कमी करण्यास मदत होणार आहे. विशेष करून संकरित गाई किंवा विदेशी गाई यामध्ये याचा खूप मोठा परिणाम होऊन, दूध उत्पादनामध्ये 30 टक्क्यांपर्यंत घट दिसून येते. त्यामुळे आता शेतकऱ्यांना या माध्यमातून दूध उत्पादनात वाढ करण्यास मदत होणार आहे.

error: Content is protected !!