Dalimb Bajar Bhav : डाळींब दरात मोठी वाढ; पहा आजचे राज्यातील बाजारभाव!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : डाळिंब उत्पादक शेतकऱ्यासांठी (Dalimb Bajar Bhav) आनंदाची बातमी आहे. अमेरिकेत पाठवल्या जाणाऱ्या भारतीय डाळिंब निर्यातीवरील निर्बंध हटवण्यात आल्याच्या निर्णयामुळे डाळिंब दराने गेल्या आठवडाभरापासून चांगलाच जोर धरला आहे. आज राज्यातील महत्त्वाच्या सर्वच बाजार समित्यांमध्ये डाळिंबाला १० ते १५ हजार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान दर मिळाला आहे. त्यामुळे आता राज्यातील हस्त बहार धरलेल्या डाळिंब शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. पुढील महिन्यात हस्त बहार डाळिंबाची बाजारात (Dalimb Bajar Bhav) मोठ्या प्रमाणात आवक होण्यास सुरुवात होईल. त्यावेळी मात्र हा दर टिकून राहणार का? हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

आजचे राज्यातील डाळिंबाचे दर (Dalimb Bajar Bhav Today 30 Jan 2024)

पुणे बाजार समितीत आज डाळिंबाची (Dalimb Bajar Bhav) 390 क्विंटल आवक झाली असून, कमाल 15000 ते किमान 1000 तर सरासरी 8000 रुपये प्रति क्विंटल, सोलापूर जिल्ह्यातील सांगोला बाजार समितीत डाळिंबाची 103 क्विंटल आवक झाली असून, कमाल 15100 ते किमान 4500 तर सरासरी 9000 रुपये प्रति क्विंटल, पंढरपूर बाजार समितीत डाळिंबाची 18 क्विंटल आवक झाली असून, कमाल 12800 ते किमान 1500 तर सरासरी 5500 रुपये प्रति क्विंटल, सांगली बाजार समितीत डाळिंबाची 5 क्विंटल आवक झाली असून, कमाल 10000 ते किमान 4000 तर सरासरी 7000 रुपये प्रति क्विंटल, पुणे-मोशी बाजार समितीत डाळिंबाची 9 क्विंटल आवक झाली असून, कमाल 10000 ते किमान 8000 तर सरासरी 9000 रुपये प्रति क्विंटल, नाशिक बाजार समितीत डाळिंबाची 83 क्विंटल आवक झाली असून, कमाल 8500 ते किमान 400 तर सरासरी 5500 रुपये प्रति क्विंटल, छत्रपती संभाजीनगर बाजार समितीत डाळिंबाची 19 क्विंटल आवक झाली असून, कमाल 7500 ते किमान 500 तर सरासरी 4000 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

मृग बहार अंतिम टप्प्यात

राज्यात सध्या मृग बहरातील नोव्हेंबर ते जानेवारी या महिन्यात होणारी डाळिंबाची आवक अंतिम टप्प्यात असून, हस्त बहराचा डाळिंब बाजारात दाखल होणार आहे. गेल्या दोन महिन्यात अर्थात डिसेंबर-जानेवारीमध्ये मृग बहरातील गुजरात आणि राजस्थान या दोन राज्यांमधील डाळिंब देशातील विविध डाळिंबाच्या बाजारपेठांमध्ये विक्रीला येत होता. ज्यामुळे वाढलेल्या आवकचा डाळिंब दरावर दबाव दिसून येत होता. या दोन राज्यांमधील हंगाम आटोपला असून, अन्य उत्पादक राज्यांमधील मृग बहराचा डाळिंबही कमी झाला आहे. परिणामस्वरूप राज्यात डाळिंब दरात वाढ झालेली दिसून येत आहे. त्यामुळे राज्यातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

error: Content is protected !!