Dam Soil For Farming : शेतीमध्ये माती टाकायचीये? अनुदानासह सरकार देतंय परवानगी!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या शेतीचे क्षेत्र कमी (Dam Soil For Farming) होत चालले आहे. त्यामुळे शेतकरी आपली खडकाळ, माळरान जमीन सुपीक बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. शेतकऱ्यांच्या या प्रयत्नांना आता राज्य सरकारने आणखी बळ देण्याचे ठरवले आहे. त्यानुसार राज्यातील ज्या शेतकऱ्यांना आपल्या जमिनीत माती टाकायची असेल, त्यांना आपल्या जवळच्या धरणातून किंवा बंधाऱ्यातून माती वाहून शेतीत (Dam Soil For Farming) टाकता येणार आहे. ही माती वाहून नेण्यासाठी सरकारकडून शेतकऱ्यांना अनुदान देखील दिले जाणार आहे. त्यामुळे आता याचा राज्यातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

काय आहे योजनेची पार्श्वभूमी? (Dam Soil For Farming)

राज्य सरकारने पाच ते सात वर्षांपूर्वी 06 मे 2017 रोजीपासून जलयुक्त शिवार योजनेची कामे केली होती. त्यावेळी ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ या योजनेद्वारे शेतकऱ्यांना माती वाहून शेतात टाकण्यास (Dam Soil For Farming) परवानगी दिली होती. त्यानुसार अनेक शेतकऱ्यांनी धरण आणि बंधाऱ्यांमधून माती वाहून नेत त्यावेळी आपली शेती सुजलाम सुफलाम केली. गेली दोन वर्ष राज्यात अधिक पाऊस पडत होता. त्यामुळे धरणे भरलेली असल्याने ही माती वाहून नेण्याची योजनेची अंमलबजावणी सरकारने थांबवली होती. मात्र, आता राज्य सरकारने यावर्षी दुष्काळाच्या काळात धरणे किंवा बंधारे जसजशी मोकळी असतील. त्या-त्या क्षमतेत माती वाहून नेण्यास, शेतकऱ्यांना पुन्हा एकदा परवानगी दिलेली आहे. या योजनेचा अधिकाधिक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले आहे.

सरकारकडून मिळणार अनुदान

विशेष म्हणजे 2023-2024 मध्ये ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना गाळ वाहून नेण्यासाठी राज्य सरकारकडून अनुदान देखील मिळणार आहे. राज्य सरकारच्या माहितीनुसार, शेतकऱ्यांना धरणातील गाळ खोदण्यासाठी लागणारी जेसीबी यंत्र व त्यासाठीचे इंधन अशा एकत्रित खर्चासाठी राज्य सरकारकडून अनुदान दिले जाणार आहे. यामध्ये 31 प्रति घनमीटर याप्रमाणे राज्यातील अत्यल्प व अल्पभूधारक शेतकऱ्यांना एकरी 15 हजार रुपयांच्या मर्यादेपर्यंत अनुदान उपलब्ध करून दिले जाणार आहे.

यापुढे योजना कायमस्वरूपी

दरम्यान, धरणांमध्ये किंवा बंधाऱ्यांमध्ये गाळ साठणे. ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे आता राज्य सरकारने ही योजना यापुढे कायमस्वरूपी राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना प्रशासनाकडे अर्ज करून, आपल्या जवळच्या बंधाऱ्यातील किंवा धरणातील माती आपल्या शेतात नेऊन टाकता येणार आहे. त्यामुळे आता या योजनेमुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या खडकाळ आणि माळरान जमिनी सुजलाम सुफलाम होण्यास मोठी मदत होणार आहे.

कुठे कराल संपर्क? (अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या ग्रामपंचायतीमध्ये या योजनेबाबत अधिक चौकशी करावी.)

error: Content is protected !!