Dam Storage : 14 राज्यातील भूजल पातळीत मोठी घट; पहा महाराष्ट्रातील साठा?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील प्रमुख 150 धरणांमधील पाण्याच्या पातळीत (Dam Storage) मोठी घट झाली असून, सध्या या जलशयांमध्ये एकूण साठवण क्षमतेच्या (Dam Storage) 70 टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा शिल्लक आहे. तर या आठवड्यात 14 राज्यांच्या भूजल पाणीपातळीतही सामान्यच्या तुलनेत मोठी घट झाली आहे. असे केंद्रीय जल आयोगाने आपल्या साप्ताहिक अहवालात म्हटले आहे.

सद्यस्थितीत दक्षिण भारतात पाऊस सुरू असूनही त्या ठिकाणी जमिनीतील पाणी पातळीत कोणतीही वाढ झाली नसल्याचे केंद्रीय जल आयोगाने आपल्या निरीक्षणात नोंदवले आहे. आयोगाच्या साप्ताहिक अहवालानुसार, 9 नोव्हेंबर 2023 रोजी देशातील धरणांच्या एकूण 178.78 अब्ज घनमीटर (बिलियन क्यूबिक मीटर) क्षमतेपेक्षा देशात सध्या केवळ 124.12 अब्ज घनमीटर पाणीसाठा शिल्लक असल्याचे म्हटले आहे. ही आकडेवारी गत वर्षासह मागील पाच वर्षातील सरासरीच्या तुलनेत कमी आहे. मागील आठवड्यात धरणांमध्ये एकूण 71 टक्के पाणीसाठा शिल्लक होता.

महाराष्ट्रातील स्थिती काय? (Dam Storage)

केंद्रीय जल आयोगाने आपल्या अहवालात महाराष्ट्रातील 32 धरणांचे परीक्षण केले आहे. महाराष्ट्रात एकूण 19.16 अब्ज घनमीटर क्षमतेची धरणे आहे. या धरणांमध्ये सध्या 15.17 अब्ज घनमीटर पाणीसाठा (Dam Storage) शिल्लक आहे. जो मागील वर्षी याच कालावधीत 18.61 अब्ज घनमीटर इतका होता. अर्थात मागील वर्षीच्या तुलनेत महाराष्ट्रात सद्यस्थितीत 3.44 अब्ज घनमीटर इतका कमी पाणीसाठा शिल्लक असल्याचे आयोगाने आपल्या अहवालात म्हटले आहे. दरम्यान, पश्चिम विभागातील गुजरात आणि महाराष्ट्र राज्याची एकत्रित आकडेवारी विचार करता, या दोन राज्यांमध्ये एकूण 37.13 अब्ज घनमीटर पाण्याची क्षमता असलेले धरणे आहेत. या धरणांमध्ये 31.71 अब्ज घनमीटर पाणीसाठा उपलब्ध आहे. अर्थात या दोन राज्यांमधील जलशयांमध्ये एकूण साठवण क्षमतेच्या 85 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. जो मागील वर्षी याच कालावधीत 95 टक्के इतका होता. असेही आयोगाने आपल्या अहवालात म्हटले आहे.

सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस

भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार, “यावर्षी ऑगस्ट महिन्यात भारतातील पावसाचे 32 टक्के कमी नोंदवले गेले. याशिवाय जून महिन्यात मान्सून आगमनास झालेला उशीर आणि ऑक्टोबर महिन्यात पावसाने दिलेली ओढ यामुळे देशातील पावसाचे प्रमाण कमी राहिले.” परिणामस्वरूप धरणांमधील पाणी पातळी सध्या मोठ्या प्रमाणात घटली असल्याचे पाहायला मिळत आहे.

रबीच्या पेरणीवर परिणाम


देशातील 712 जिल्ह्यांमध्ये पाऊस झालेला नसून, तो खूपच कमी आहे. त्यामुळे आता यंदा मान्सूनचा झालेला कमी पाऊस आणि धरणांतील घटलेली पाणीपातळी पाहता रबी हंगामातील पेरणीसह एकूण उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे सध्या दक्षिणेकडील (तामिळनाडू, कर्नाटक, आंध्रप्रदेश) राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. मात्र त्या ठिकाणी जमिनीतील पाणी पातळीत कोणतीही सुधारणा झालेली नाही. असेही आयोगाने आपल्या साप्ताहिक अहवालात म्हटले आहे.

error: Content is protected !!