Dam Storage In Maharashtra : राज्यातील धरणसाठ्यात 20 टक्क्यांनी घट; पहा तुमच्या धरणातील साठा!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यामध्ये एकूण २ हजार ९९४ लहान-मोठे धरणे असून, या धरणांमध्ये सध्यस्थितीत केवळ ६९.९७ टक्के जलसाठा (Dam Storage In Maharashtra) शिल्लक आहे. मागील वर्षी याच कालावधीत राज्यातील सर्व धरणांमध्ये ९०.२० टक्के जलसाठा शिल्लक होता. अर्थात या वर्षी धरणांतील जलसाठ्यामध्ये २० टक्के घट झाली आहे. धरण पाणलोटात बाष्पीभवनही वाढले आहे. त्यामुळे काही धरणांमध्ये पाणीसाठ्यात घटही दिसत असून, वर्षभर शेतीसह पिण्यासाठी पाणी कसे पुरेल? अशी चिंता लागून आहे. राज्यातील धरणांमध्ये किती पाणीसाठा शिल्लक आहे जाणून घेऊया…

राज्य सरकारच्या जलसंपदा विभागाच्या (Dam Storage In Maharashtra) आकडेवारीनुसार, औरंगाबाद विभागात सध्या पाण्याची भीषण परिस्थिती असून, विभागातील एकूण ९२० धरणांमध्ये सध्या केवळ ३७.१८ टक्के जलसाठा शिल्लक आहे. जो मागील वर्षी याच कालावधीत ९०.०५ टक्के इतका होता. नागपूर विभागातील एकूण ३८३ धरणांमध्ये सध्या ७३.२१ टक्के जलसाठा शिल्लक आहे. जो मागील वर्षी याच कालावधीत ८४.२९ टक्के इतका होता. अमरावती विभागातील एकूण २६१ धरणांमध्ये सध्या ७९.४५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. जो मागील वर्षी याच कालावधीत ९६.८३ टक्के इतका होता. पुणे विभागातील एकूण ७२० धरणांमध्ये सध्या ७५.८२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. जो मागील वर्षी याच कालावधीत ९१.४५ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. नाशिक विभागातील ५३७ धरणांमध्ये सध्या ७५.८६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. जो मागील वर्षी याच कालावधीत ८९.७१ टक्के इतका होता. तर कोकण विभागातील १७३ धरणांमध्ये सध्या सर्वाधिक ७५.८६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. जो मागील वर्षी याच कालावधीत ८९.७१ टक्के इतका होता.

विभागनिहाय प्रमुख धरणांतील पाणीसाठा (Dam Storage In Maharashtra)

औरंगाबाद विभाग
धरणाचे नाव सध्याचा जलसाठा (टक्क्यांमध्ये) मागील वर्षीचा जलसाठा (टक्क्यांमध्ये)
१. जायकवाडी (औरंगाबाद) ४२.७४ १००
२. माजलगाव (बीड) ६.५८ १००
३. मांजरा (बीड) २५.६० १००
४. सिद्धेश्वर (हिंगोली) ९४.३३ ९८.३८
५. तेरणा (उस्मानाबाद) १७.८५ १००
६. नागझरी (लातूर) ७८.१६ १००
७. शिवनी (लातूर) २२.३१ १००
८. दुधना (परभणी) २२.६३ ७५.०५

नागपूर विभाग
१. गोसीखुर्द (भंडारा) ५५.३१ ६७.६४
२. इटियाडोह (गोंदिया) ९४.९९ ९८.२५
३. कामठी खैरी (नागपूर) ४८.०९ ९२.७४
४. तोतलाडोह (नागपूर) ८१.३९ ८८.१४
५. लोअर वर्धा (वर्धा) ८५.०६ १००

अमरावती विभाग
१. काटेपूर्णा (अकोला) ७१.२७ ९८.५९
२. अप्पर वर्धा (अमरावती) ९२.३६ ९९.६७
३. खडकपूर्णा (बुलढाणा) ६.८८ १००
४. बेंबळा (यवतमाळ) ६२.१० ९६.६९

पुणे विभाग
१. राधानगरी (कोल्हापूर) ९३.३४ ९७.१२
२. वारणा (सांगली) ९२.९९ ९४.४१
३. कोयना (सातारा) ८०.६६ ९६.४४
४. उजनी (सोलापूर) ४६.३० १००
५. खडकवासला (पुणे) ६८.७७ ६०.४६
६. पानशेत (पुणे) ९७.६५ १००
७. वरसगाव (पुणे) ९३.७२ ९९.३३
८. टेमघर (पुणे) ६६.३० ९१.८८
९. मुळशी (पुणे) ९२.६७ ९२.५२
१०. पवना (पुणे) ७९.४५ ८१.५१
११. डिंभे (पुणे) ९५.८३ १००

कोकण विभाग
१. मध्य वैतरणा (पालघर) ६५.१९ ७५.३८
२. तिल्लारी (सिंधुदुर्ग) ८९.९२ ९४.१८
३. भातसा (ठाणे) ८९.१५ ९३.१४
४. मोडकसागर (ठाणे) ८८.९४ ८७.९६
५. तानसा (ठाणे) ८७.१८ ९२.२९
६. घाटघर (ठाणे) ८९.४९ ९७.४३

नाशिक विभाग
१.भंडारदरा (अहमदनगर) ८९.२९ ९९.८७
२. निळवंडे (अहमदनगर) ९३.८२ १००
३. मुळा (अहमदनगर) ८५.३६ १००
४. हतनूर (जळगाव) १०० १००
५. चणकापूर (नाशिक) ८१.७२ ८३.६५
६. दारणा (नाशिक) ९६.३९ ९८.८०
७. गंगापूर (नाशिक) ९२.२७ ९७.२१
८. गिरणा (नाशिक) ५३.५८ १००
९. ओझरखेड (नाशिक) ८५.४४ ९९.६६
१०. पुणेगाव (नाशिक) ७७.५२ ९९.१५
११. पालखेड (नाशिक) ३७.९१ ९९.७४

error: Content is protected !!