Dam Storage : राज्यातील धरणांमधील पाणी साठ्यात मोठी घट; ‘पहा’ तुमच्या धरणातील साठा!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : यावर्षी राज्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने, अनेक भागांमध्ये भीषण पाणी टंचाई (Dam Storage) आहे. त्यातच आता राज्यातील सर्व लहान-मोठ्या धरणांमध्ये एकत्रितपणे केवळ 63.47 टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याचे समोर आले आहे. मागील वर्षी याच कालावधीत राज्यातील सर्व धरणांमध्ये 84.73 टक्के इतका पाणीसाठा शिल्लक होता. यावर्षी मराठवाडा विभागातील (औरंगाबाद) धरणांमध्ये सर्वात कमी 36.73 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. जो मागील वर्षी याच कालावधीत 84.44 टक्के (Dam Storage) इतका होता. त्यामुळे मराठवाड्यात सध्या पाण्याची भीषण टंचाई आहे.

विभागनिहाय पाणीसाठा

सद्यस्थितीमध्ये कोकण विभागातील धरणांमध्ये 79.21 टक्के पाणीसाठा (Dam Storage) आहे. जो मागील वर्षी याच कालावधीत 80.74 टक्के इतका होता. नागपूर विभागातील धरणांमध्ये सध्या 68.88 टक्के पाणीसाठी शिल्लक आहे. जो मागील वर्षी याच कालावधीत 79.16 टक्के इतका होता. अमरावती विभागातील धरणांमध्ये 73.48 टक्के पाणीसाठी शिल्लक आहे. जो मागील वर्षी याच कालावधीत 86.66 इतका होता. नाशिक विभागातील धरणांमध्ये 67.46 टक्के पाणीसाठी शिल्लक आहे. जो मागील वर्षी याच कालावधीत 88.83 टक्के इतका होता. पुणे विभागातील धरणांमध्ये 66.73 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. जो मागील वर्षी याच कालावधीत 85.45 टक्के इतका होता. औरंगाबाद विभागातील धरणांमध्ये सर्वात कमी म्हणजे 36.73 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. जो मागील वर्षी याच कालावधीत 84.44 टक्के इतका होता.

प्रमुख धरणांमधील पाणीसाठा (Dam Storage In Maharashtra)

खाली दिलेल्या धरणांमधील पाणीसाठा हा टक्केवारीमध्ये असून, कंसात दिलेली आकडेवारी ही मागील वर्षी याच कालावधीत असलेल्या त्या-त्या धरणातील पाणीसाठा दर्शविते.

नागपूर विभागातील धरणे

  • गोसीखुर्द प्रकल्प 52.86 (57.36)
  • कामठी खैरी 71.97 (94.57)
  • तोतलाडोह 75.00 (83.10)
  • लोअर वर्धा 78.90 (86.23)

अमरावती विभागातील धरणे

  • काटेपूर्णा 58.77 (80.35)
  • अप्पर वर्धा 81.39 (84.87)
  • नळगंगा 40.62 (80.36)
  • बेंबळा 51.32 (75.17)

औरंगाबाद विभागातील धरणे

  • जायकवाडी 43.53 (92.42)
  • माजलगाव 9.92 (89.26)
  • सिद्धेश्वर 92.29 (43.94)
  • नागझरी 61.49 (100.00)
  • लोअर दुधना 20.73 (68.79)

नाशिक विभागातील धरणे

  • भंडारदरा 60.68 (98.66)
  • गंगापूर 78.08 (89.84)
  • गिरणा 49.99 (100.00)
  • दारणा 59.94 (95.03)
  • चणकापूर 80.30 (82.82)

पुणे विभागातील धरणे

  • खडकवासला 76.37 (64.32)
  • टेमघर 36.25 (63.94)
  • मुळशी 83.99 (80.36)
  • कोयना 76.20 (86.49)
  • उजनी 19.46 (100.00)

कोकण विभागातील धरणे

  • मध्य वैतरणा 47.37 (49.57)
  • मोडकसागर 68.05 (76.23)
  • तानसा 78.79 (84.99)
  • भातसा 78.05 (83.12)
  • घाटघर 67.32 (86.93)
error: Content is protected !!