हॅलो कृषी ऑनलाईन : भारतीय हवामानशास्र विभागाने यंदाचा उन्हाळा हा अधिक (Dam Storage) तापदायक राहणार असल्याचे नुकतेच जाहीर केले आहे. अशातच आता राज्यातील धरणांमधील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. त्यामुळे धरण क्षेत्रातील उन्हाळी पिकांच्या शेतीसह, पिण्याचा पाण्याचा प्रश्न बिकट होणार आहे. राज्यातील सर्वात मोठे धरण असलेल्या जायकवाडी धरणात सध्या केवळ 25 टक्के इतका पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. ज्यामुळे सध्या मराठवाड्याला मोठ्या पाणी संकटातून जावे लागत आहे. तर दुसरे महत्वाचे धरण असलेल्या उजनीने, जानेवारी महिन्याच्या शेवटी शून्यातून मायनस पाणीसाठ्याकडे (Dam Storage) आपली वाटचाल केव्हाच सुरु केलेली आहे. त्यामुळे जपून पाणी वापरण्याची गरज निर्माण झाली आहे.
राज्यातील प्रमुख धरणांमधील पाणीसाठा (Maharashtra Dam Storage Today)
राज्यातील धरणांची खाली दिलेली कंसातील आकडेवारी मागील वर्षीचा तर कंसाबाहेरील आकडेवारी ही धरणांमधील सध्याचा पाणीसाठा दर्शविते.
औरंगाबाद विभागातील धरणे
- जायकवाडी 25.60 (52.36)
- येलदरी 41.22 (0.00)
- सिद्धेश्वर 76.31 (34.17)
- नागझरी 27.30 (42.90)
- लोअर दुधना 11.76 (49.94)
पुणे विभागातील धरणे
- खडकवासला 62.92 (61.73)
- टेमघर 10.21 (9.71)
- मुळशी 58.90 (77.34)
- कोयना 58.34 (82.97)
- उजनी 0.00 (100.00)
नाशिक विभागातील धरणे
- भंडारदरा 46.86 (90.08)
- गंगापूर 57.36 (66.89)
- गिरणा 32.83 (38.28)
- दारणा 34.78 (93.24)
- चणकापूर 25.93 (37.41)
नागपूर विभागातील धरणे
- गोसीखुर्द प्रकल्प 50.22 (44.47)
- कामठी खैरी 47.99 (86.36)
- तोतलाडोह 62.98 (66.30)
- लोअर वर्धा 58.38 (56.85)
अमरावती विभागातील धरणे
- काटेपूर्णा 32.53 (51.05)
- अप्पर वर्धा 58.90 (53.80)
- नळगंगा 34.41 (45.96)
- बेंबळा 39.25 (44.13)
कोकण विभागातील धरणे
- मध्य वैतरणा 11.80 (16.25)
- मोडकसागर 51.54 (52.31)
- तानसा 59.61 (59.78)
- भातसा 55.04 (53.33)
- घाटघर 69.46 (52.04)
दरम्यान, सध्याच्या घडीला राज्यात सर्व धरणांमधील एकूण पाणीसाठा (Dam Storage) हा 45.62 टक्के इतका आहे. जो मागील वर्षी याच कालावधीत 61.87 टक्के इतका होता. तर विभागनिहाय विचार करता, सध्या कोकण विभागात सर्वाधिक 58.57 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तर सर्वात कमी पाणीसाठा हा औरंगाबाद विभागात 23.47 टक्के इतका आहे. तर नाशिक (46.44 टक्के) आणि पुणे (47.35 टक्के) विभागातील धरणांतील एकूण पाणीसाठा हा 50 टक्के पेक्षा खाली घसरला आहे. याउलट नागपूर आणि अमरावती विभागात सध्या अनुक्रमे 54.20 टक्के, 56.77 टक्के इतका पाणीसाठा आहे. दरम्यान, राज्यातील सर्वच विभागातील सध्याचा पाणीसाठा हा मागील वर्षीच्या या कालावधीतील पाणीसाठ्याच्या मानाने खूपच कमी आहे.