Dam Storage : राज्यातील धरणांची पाणीपातळी खालावली; वाचा.. तुमच्या धरणात कितीये पाणी!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील धरणांचा पाणीसाठा (Dam Storage) चिंताजनक पातळीवर असून, सध्या सर्वच महत्वाच्या धरणांमध्ये मागील वर्षीपेक्षा खूपच कमी पाणीसाठा शिल्लक आहे. राज्यातील सर्व लहान मोठ्या धरणांमध्ये सध्या केवळ 42.34 टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे. जो मागील वर्षी याच कालावधीत 61.93 टक्के इतका शिल्लक होता. ज्यामुळे सध्या अनेक भागांमध्ये पिण्याचा पाण्याचा बिकट प्रश्न निर्माण झाला आहे. तर राज्यातील काही भागांमध्ये असलेल्या उन्हाळी पिकांना देखील पाणी मिळण्यास (Dam Storage) अडचण निर्माण होत आहे.

धरणांमधील आजचा पाणीसाठा (Maharashtra Dam Storage Today)

राज्यातील धरणांची खाली दिलेली कंसातील आकडेवारी मागील वर्षीचा तर कंसाबाहेरील आकडेवारी ही धरणांमधील आजचा पाणीसाठा दर्शविते.

औरंगाबाद विभागातील धरणे

  • जायकवाडी 24.18 (52.36)
  • येलदरी 40.70 (0.00)
  • सिद्धेश्वर 53.05 (34.17)
  • नागझरी 20.11 (42.90)
  • लोअर दुधना 9.88 (49.94)

पुणे विभागातील धरणे

  • खडकवासला 53.12 (88.76)
  • टेमघर 9.67 (55.32)
  • मुळशी 53.42 (77.34)
  • कोयना 53.48 (82.97)
  • उजनी 0.00 (100.00)

नाशिक विभागातील धरणे

  • भंडारदरा 46.55 (90.08)
  • गंगापूर 52.46 (66.39)
  • गिरणा 32.21 (38.28)
  • दारणा 27.46 (93.24)
  • चणकापूर 25.10 (82.46)

नागपूर विभागातील धरणे

  • गोसीखुर्द प्रकल्प 48.71 (40.38 )
  • कामठी खैरी 47.14 (86.36)
  • तोतलाडोह 62.30 (66.30)
  • लोअर वर्धा 57.94 (56.85)

अमरावती विभागातील धरणे

  • काटेपूर्णा 33.72 (51.05)
  • अप्पर वर्धा 61.35 (53.80)
  • नळगंगा 35.39 (45.96)
  • बेंबळा 39.25 (44.13)

कोकण विभागातील धरणे

  • मध्य वैतरणा 10.45 (16.25)
  • मोडकसागर 48.50 (52.31)
  • तानसा 56.40 (59.78)
  • भातसा 50.79 (53.33)
  • घाटघर 52.14 (52.04)

मराठवाड्यात चिंताजनक परिस्थिती

धरणांच्या पाणीसाठ्याच्या वरील आकडेवारीनुसार, राज्यात सध्या सर्वात कमी पाणीसाठा मराठवाडा विभागामध्ये असून, त्या ठिकाणी सर्व लहान मोठ्या धरणामध्ये (Dam Storage) एकूण केवळ 22.01 टक्के पाणीसाठा शिल्ल्क आहे. मागील वर्षी याच कालावधीत मराठवाडा विभागातील सर्व धरणांमध्ये एकूण 47.33 टक्के पाणीसाठा शिल्लक होता.

सध्याच्या घडीला राज्यातील कोकण विभागात इतर विभागांच्या तुलनेत सर्वाधिक पाणीसाठी असून, त्या ठिकाणच्या धरणांमध्ये सध्या 55.10 टक्के पाणीसाठा आहे. जो मागील वर्षी याच कालावधीत 52.74 टक्के इतका होता. दरम्यान, नाशिक विभागात सध्या 42.77 टक्के, पुणे विभागात 43.18 टक्के, अमरावती विभागात 53.23 टक्के, नागपूर विभागात 51.84 टक्के पाणीसाठा आहे. जो मागील वर्षी याच कालावधीत अनुक्रमे 57.97 टक्के, 76.91 टक्के, 55.54 टक्के, 53.24 टक्के इतका होता. त्यामुळे आगामी तीन महिने शेतीसह पिण्याचे पाणी जपून वापरण्याची गरज निर्माण झाली आहे.

error: Content is protected !!