Dam Storage : राज्यातील धरणांचा पाणीसाठा निम्म्यावर; पहा… कोणत्या धरणात किती पाणी?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या थंडीचे प्रमाण काहीसे कमी झाले असून, दुपारच्या सुमारास उन्हाच्या झळा (Dam Storage) बसण्यास सुरुवात झाली आहे. त्याचा राज्यातील रब्बी आणि उन्हाळी पिकांवरही परिणाम दिसून येत आहे. पिकांना एकदा पाणी दिल्यानंतर, पुन्हा लवकर पाणी देण्याची गरज भासत आहे. अशातच आता उन्हाळ्याच्या तोंडावरच राज्यातील सर्व धरणांचा पाणीसाठा हा निम्म्यावर येऊन ठेपला आहे. मराठवाडा विभागात तर सध्या पिण्याची पाण्याची भीषण परिस्थिती असून, त्या ठिकाणच्या सर्व धरणांचा पाणीसाठा (Dam Storage) हा 31.32 टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे.

मराठवाड्यात भीषण परिस्थिती (Dam Storage In Maharashtra)

सध्यस्थितीत राज्यातील सर्व लहान-मोठ्या धरणांमध्ये 53.67 टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे. जो मागील वर्षी याच 80.09 टक्के इतका होता. ज्यामुळे उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच इतका कमी पाणीसाठा असताना, पुढील 4 ते 5 महिने शेतीसह पिण्याच्या पाण्याचा काटकसरीने वापर करणे क्रमप्राप्त ठरणार आहे. औरंगाबाद विभागातील (मराठवाडा) धरणांमध्ये सर्वात कमी म्हणजे 31.32 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. जो मागील वर्षी याच कालावधीत 79.73 टक्के इतका होता. औरंगाबाद विभाग वगळता अन्य सर्व विभागातील धरणांमध्ये निम्म्याहून अधिक (५५ ते ६३ टक्क्यांदरम्यान) पाणीसाठा शिल्कक आहे.

राज्यातील प्रमुख धरणांमधील पाणीसाठा

राज्यातील धरणांची खाली दिलेली कंसातील आकडेवारी मागील वर्षीचा तर कंसाबाहेरील आकडेवारी ही धरणांमधील सध्याचा पाणीसाठा दर्शविते.

औरंगाबाद विभागातील धरणे

  • जायकवाडी 39.84 (89.87)
  • येलदरी 53.87 (98.73)
  • सिद्धेश्वर 34.52 (34.17)
  • नागझरी 48.28 (42.90)
  • लोअर दुधना 15.56 (65.14)

पुणे विभागातील धरणे

  • खडकवासला 56.22 (61.73)
  • टेमघर 12.56 (55.32)
  • मुळशी 67.13 (77.34)
  • कोयना 66.49 (82.97)
  • उजनी 0.00 (100.00)

नाशिक विभागातील धरणे

  • भंडारदरा 60.35 (98.42)
  • गंगापूर 66.09 (86.30)
  • गिरणा 41.48 (93.75)
  • दारणा 51.36 (93.38)
  • चणकापूर 50.45 (82.46)

नागपूर विभागातील धरणे

  • गोसीखुर्द प्रकल्प 49.57 (54.87)
  • कामठी खैरी 67.19 (71.97)
  • तोतलाडोह 64.66 (81.05)
  • लोअर वर्धा 67.36 (79.78)

अमरावती विभागातील धरणे

  • काटेपूर्णा 40.82 (74.11)
  • अप्पर वर्धा 69.42 (79.97)
  • नळगंगा 37.19 (75.40)
  • बेंबळा 41.09 (68.55)

कोकण विभागातील धरणे

  • मध्य वैतरणा 11.28 (42.20)
  • मोडकसागर 63.18 (52.31)
  • तानसा 66.95 (59.78)
  • भातसा 67.94 (80.09)
  • घाटघर 35.41 (76.42)
error: Content is protected !!