Dangi Cow Breed: सह्याद्री पर्वत रांगामधील शेतकयांसाठी वरदान; ‘डांगी गाय’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Table of Contents

हॅलो कृषी ऑनलाईन: शेत कामांसाठी ज्या गायी (Dangi Cow Breed) आणि बैलांचा वापर केला जातो त्यामध्ये डांगी जातीला फार महत्व आहे. सह्याद्री पर्वतरांगांमधील शेतक-यांचेसाठी वरदान ठरलेल्या आहेत. जाणून घेऊ या डांगी गायीविषयी (Dangi Cow Breed).

उगम   (Dangi Cow Breed)                                                        

या जातीचा उगम गुजरात राज्यातील डांग जिल्ह्यात झालेला आहे, त्यावरूनच या गायीचे नाव डांगी (Cow Breed) असे पडले आहे. महाराष्ट्रात प्रामुख्याने नाशिक अकोला, अहमदनगर या जिल्ह्यातही या गायी मोठ्या प्रमाणात आढळतात. या गायी मुख्यत: दूध उत्पादन आणि शेती कामासाठी (Dual Purpose Breed) वापरल्या जातात.

शरीररचना                                                                               

या गायी लहानसर हे मध्यम ठेवणीचा आहे. गायीच्या कातडीखाली तैलग्रंथीचा हलका स्तर असतो ह्यामुळे मोठ्या पावसामध्ये गायी/बैल भिजले तरीही पाणी अंगात मुरत नाही व आजारपण येत नाही हे सर्वात मोठे नैसर्गिक वरदान या गायीला प्राप्त आहे.

या गायी काळ्या रंगावर पांढरे ठिपके, पांढ-या रंगावर काळे ठिपके अशा संमिश्र रंगाच्या असतात. शरीराने पुष्ट असून अतिशय विलक्षण चमक या गायीला प्राप्त होते. नजरेत भरेल अशी आकर्षक कपाळाची ठेवण असते, कपाळामध्ये अगदी मधोमध लहानसर उंचवटा असतो, शिंगे लहान दंडगोलाकृती किंचित मागे झुकलेली व संपूर्णपणे काळ्या रंगाची असतात, नाकपुडी संपूर्णता: काळी व मध्यभागी फुगीर असते, खांदे भक्कम असतात, वशिंड लहानसर आकाराचे पण घट्ट असते, पाय उंचीने जरा लहानसर असतात, खूप एकसंघ, लहान परंतु अत्यंत टणक व संपूर्णता काळे असतात. या गुणामुळेच उंच डोंगरांमध्ये अवघड जागी जाऊन चरणे या गायीला सहज शक्य होते.

प्रजनन आणि उत्पादन                                                                            

या गायीचे (Dangi Cow Breed) प्रथम माजावर येण्याचे वय (Puberty Age) 36 ते 44 महिने असते. दूध देण्याचा कालावधी 150 ते 180 दिवसांचा असून एका वेतात 430 ते 800 लिटर पर्यंत दूध देते. दिवसाकाठी 3 ते 4 लिटर दूध देण्याची क्षमता (Milk Production) या गायीत असते. या गायीचे सरासरी आयुष्य 15 ते 16 वर्ष असते.

इतर वैशिष्ट्ये                                                     

ह्या गायीच्या रंगाच्या मिश्रणानुरुप स्थानिक परिभाषेत या गायीचे सहा प्रकार आहेत. १) काळाबाळा २) पांढरा बाळा ३) मणेरी ४) लाल बाळा ५) लाला ६) बाळा.                  

बैलांच्या (Dangi Bull) अंगामध्ये शेतीकामाची विलक्षण चिकाटी व ताकद असते त्यामुळे सलग 5 ते 6 तास सुद्धा अडचणीच्या उताराच्या खाचरांमध्ये उखळणी व चिखलणीची कामे सहज करतात.

error: Content is protected !!