अभिनेता दीप सिद्धूला अखेर अटक; 26 जानेवारीच्या आंदोलनाप्रकरणी कारवाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । 26 जानेवारीला लाल किल्ल्यावरील हिंसक आंदोलनाप्रकरणी अभिनेता आणि गायक दीप सिद्धूला अटक करण्यात आली आहे. प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावरील हिंसक आंदोलनाप्रकरणी दीपला बेड्या ठोकण्यात आल्या. दिल्लीच्या स्पेशल सेलने ही कारवाई केली. पोलिसांनी दीप सिद्धूवर एक लाखाचे इनाम घोषित केले होते.

प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावरील हिंसक आंदोलनाप्रकरणी माहिती देणाऱ्या रोख बक्षीस देण्याची घोषणा पोलिसांनी केली होती. बूटा सिंह, सुखदेव सिंह, जजबीर सिंह आणि इकबाल सिंह यांच्यावर प्रत्येकी 50 हजारांचे रोख पारितोषिक जाहीर करण्यात आले होते. तर दीप सिद्धूसह जुगराज सिंह, गुरजोत सिंह आणि गुरजंत सिंह यांच्यावर प्रत्येकी एक लाखाचे बक्षीस होते.

26 जानेवारी रोजी ट्रॅक्टर मार्च दरम्यान हिंसा भडकली होती. त्याचा तपास करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली होती. जॉइंट कमिशनर बी. के. सिंह यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटीची टीम तपास करत आहे. या टीममध्ये तीन डीसीपींचा समावेश करण्यात आला आहे. यात जॉय टिर्की, भीष्म सिंह आणि मोनिका भारद्वाज यांचा समावेश आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!