Deoni Cow : मराठवाडा भूषण म्हणून ओळखली जाणारी देवणी गाय तुम्हाला माहितीय का? किती दूध देते अन माजावर कधी येते जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Animal husbandry : आपल्या भारतीय गायीमध्ये दुहेरी उपयुक्तता असलेले गुणधर्म आहेत. त्यामध्ये अत्यंत देखणा, विविध स्तरांवरील प्रदर्शनांत मानांकन सिद्ध करणारा गोवंश म्हणजे देवण गाय (Deoni Cow). या गायीला मराठवाडा भूषण अशी बिरुदावली सुद्धा प्राप्त झाली आहे. विदेशी संकर केल्यास उत्तम दुधाच्या गायी देणारा, दुग्धोत्पादन व शेतीकाम यांमध्ये समान उपयुक्ततेचा व दुष्काळग्रस्त परिस्थितीमध्ये समर्थपणे तोंड देणारा असा हा पाळीव प्राणी आहे.

ही काय कोठे आढळते?

सुमारे 200 वर्षापर्वी डांगी व गिर यांच्या संकरातून मराठवाड्यात देवणी हा गोवंश उदयास आला. महाराष्ट्रात लातूर जिल्ह्यामध्ये उदगीर, चाकूर, शिरूर अनंतपाळ, हरंगूळ, देवणी, निलंगा, अहमदपूर येथे तसेच मोठ्या प्रमाणावर उस्मानाबाद, नांदेड, परभणी, बीड या जिल्ह्यांमध्ये काही प्रमाणात खास हौशीने विक्रीसाठी पैदास करणारे शेतकरी आहेत.

शारिरीक ठेवण कशी असते?

या गायी मध्यम आकाराच्या व आपोटशीर बांध्याच्या असतात. गायीचा मूळ रंग पांढरा व त्यावर काळ्या रंगाचे अनियमित आकाराचे पट्टे(ठिपके) येतात. गायींच्या कातडीला विलक्षण अशी देखणी चमक असते. त्वचा अत्यंत मऊ असते आणि कातडी शरीराला घट्ट चिकटलेली असते. या गायीच्या कपाळावर ठेवण भरदार व नजरेत भरणारी असते. शिंगे मागाहून बाहेरच्या बाजूस येणारी बाकदार व दंडगोलाकृती असतात. शिंगाचा रंग काळा असतो, डोळे लांबट व अंडाकृती असतात. पापण्या संपूर्णपणे काळ्या असतात.

बैलांच्या नजरेत जरब असते व कायम रोखून बघण्याची सवय असते. कान मध्यभागी पसरट, टोकाला गोलाकार व मागे पडलेले असतात. नाकपुडी काळी पसरट व मध्यभागी फुगीर असते. वशिंड पिळदार घट्ट परंतु शरीराच्या एका बाजूस थोडे झुकलेले असते. मानेखालची पोळी (लोळी) शरीराला शोभेल अशी असते. मान लांब व रुंद असते. बैल लांब पौंडी असतात. मागचे पाय शरीराच्या मानाने किंचित उंच असतात व मांड्या पुष्टदार असतात. पाठ मागच्या बाजूने वशिंडाकडे किंचीत उतरती असते. त्यामुळे शोभा येते.

इतर वैशिष्ट्ये –

या गायीच्या कालवडीचे प्रथम माजावर येण्याची वय सर्वसाधारण 30 ते 35 महिन्यापर्यंत असते. परंतु उत्तम मेहनतीवर 24 ते 27 महिन्यापर्यंत माजावर येऊन गाभण राहिल्याच्या नोंदी उपलब्ध आहेत. ऐन दुधाच्या भरात दिवसाकाठी 6 ते 7 लिटर दूध सहज देतात. दूध विनातक्रार अंत 18 ते 21 महिने देतात. या गायींचे दोन वेतामधील अंतर 18 ते 21 महिन्यांचे असते. दोन वेतांमधील भाकडकाळ हा 4 ते 6 महिन्यांचा असतो. दुधाला सरासरी फॅट 3.5 ते 4.5 लागते. या जातीच्या बैलांना मराठवाड्यातील तीव्र उन्हामध्ये सुद्धा काम करण्याची प्रचंड शक्ती ही निसर्गाची मोठी देणगी आहे.

error: Content is protected !!