Deshi Cow : … अशी ओळखा देशी गाय; खरेदीदरम्यान नाही होणार फसवणूक!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात दूध उत्पादक शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. अशातच सध्या देशी गायींच्या (Deshi Cow) दूध, लोणी, तूप यांसारख्या उत्पादनांना मोठी मागणी असल्याने, देशी गायींच्या पालनाचे महत्व वाढले आहे. देशी गायीच्या दुधासह तुपाचे आणि लोण्याचे मोठे गुणधर्म आहेत. अशातच आता तुम्ही देखील देशी गायीचे संगोपन करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण अनेक दूध उत्पादकांची देशी गायींची ओळख पटवण्याबाबत माहिती नसल्याने फसगत होऊ शकते. याच पार्श्वभूमीवर आज आपण देशी गायींची (Deshi Cow) ओळख नेमकी कशी पटवायची? याबाबत सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

51 जातींची आतापर्यंत नोंद (How To Identify Deshi Cow)

काही महिन्यांपूर्वीच कृषी मंत्रालयाकडून 10 देशी गायींची (Deshi Cow) नोंदणी करण्यात आली आहे. यापूर्वी नोंदणीकृत गायींची संख्या 41 होती, ती आता 51 झाली आहे. पोडा थुरुपू, नारी, डगरी, थूथो, श्वेता कपिला, हिमाचली पहारी, पूर्णिया, कथनी, संचौरी आणि मासिलम या देशी गायींचा यादीत समावेश करण्यात आला आहे. नागालँडच्या थुथो जातीचीही नोंदणी झाली आहे.

देशी गाईच्या (Deshi Cow) दुधाची आणखी एक खास गोष्ट म्हणजे त्याच्या दुधापासून बनवलेले तूप हाताने घसळून बनवले तर त्याचे महत्त्व आणखी वाढते. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि बिहारमध्ये देशी गायींची संख्या सर्वाधिक आहे. उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये देशातील सर्वात मोठे पशु संशोधन केंद्र उभारण्यात आले आहे. देशी गायींची संख्या वाढवण्यासाठी कृत्रिम वीर्य तंत्रज्ञानाचाही वापर केला जात आहे.

अशी ओळखा देशी गाय?

  • गीर गाय – गीर गायीची ओळख ही तिचे लटकलेले कान, काळे डोळे आणि पसरलेली शिंगे यावरून समजते. गीर गाय ही गुजरात राज्यातील जात आहे.
  • साहिवाल गाय – साहिवाल गायीची ओळख म्हणजे तिचा लाल आणि तपकिरी रंग असतो. गायीची ही जात मूळची पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील आहे.
  • राठी गाय – राठी गाय ही तपकिरी, पांढरी आणि लाल रंगाची असते. तिचे मूळ स्थान राजस्थान हे आहे.
  • नागोरी गाय – नागोरी गाईची शिंगे आणि खुर पूर्णपणे काळे असतात. ही गाय राजस्थानच्या जोधपूरची आहे.
  • थारपारकर गाय – थारपारकर गायीच्या कानाच्या आतील कातडी पिवळ्या रंगाची असून, ती राजस्थानी जातीची आहे.
  • हरियाणवी गाय – हरियाणवी गाय ही बहुतेकदा पांढऱ्या किंवा तपकिरी रंगात आढळते. तिचा चेहरा अरुंद आणि शिंगे मोठी असतात. नावानुसार गायीची ही जात हरियाणाची आहे.
  • कांकरेज गाय – कांकरेज गायीची ओळख म्हणजे तिची शिंगे खूप मोठी असतात. ही गाय बहुतेक करून गुजरातमध्येच आढळते.
  • बद्री गाय – बद्री गाय तिच्या रंगावरून देखील ओळखली जाते. ही गाय तपकिरी, पांढरा, लाल आणि काळ्या रंगाची असते. तिचे मूळस्थान उत्तराखंड आहे.
  • पुंगनूर गाय – पुंगनूर गाय ही उंचीने खूपच लहान असते. ती दररोज केवळ तीन ते पाच लिटर दूध देते. पंतप्रधान मोदींनी देखील या जातीच्या गायीचे कौतुक केले आहे. गायीची जात प्रामुख्याने आंध्रप्रदेशात आढळते.
  • लाल सिंधी गाय – लाल सिंधी गाय ही नावाप्रमाणेच पूर्णपणे लाल रंगाची असते. तिचे नाक देखील लाल रंगाचे असते. ही जात मूळची पाकिस्तानची आहे.
error: Content is protected !!